मुंबई, 30 सप्टेंबर : इंग्लंड दौऱ्यावेळी भारताचा (India tour of England) स्टार ऑफ स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) याने कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) बीसीसीआयकडे (BCCI) तक्रार केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. या सगळ्या प्रकरणावर आता खुद्द आर.अश्विननेच मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत अश्विनने या सगळ्या बातम्यांमधली हवाच काढून टाकली आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेने अश्विनने विराटची तक्रार केल्याचं वृत्त दिलं होतं. वाऱ्याच्या वेगाने हे वृत्त पसरल्यानंतर अखेर अश्विनने स्पष्टीकरण द्यायचं ठरवलं.
'फेक न्यूज देणाऱ्या हॅण्डलचा मी शोध घेत आहे. गॉसिप करण्यासाठी हे मजेदार आहे,' असं अश्विन म्हणाला. यानंतर अश्विनच्या चाहत्यांनी ही बातमी कुठून आली त्याबद्दल सांगितलं, यावर अश्विनने प्रतिक्रिया दिली. धन्यवाद मित्रांनो. त्यांनी आता स्वत:चं नाव बदलून आयएएनएस ठेवलं आहे. बाकीची माध्यमं त्यांच्या हवाल्याने वृत्त देत आहेत. खूपच मजा, असं अश्विन म्हणाला.
इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट कोहलीने अश्विनला एकही टेस्ट मॅचमध्ये खेळण्याची संधी दिली नाही. यानंतर विराट कोहलीवर चौफेर टीका करण्यात आली. टीममध्ये संधी मिळत नसल्यामुळे अश्विनला असुरक्षित वाटत होतं आणि त्याने बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याकडे विराटची तक्रार केल्याचं या वृत्तात म्हणलं गेलं होतं.
टीम इंडियातील वादावर BCCI ची पहिली प्रतिक्रिया, विराट कोहलीवर दिलं 'हे' स्पष्टीकरण
अश्विनसोबतच चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनीही विराट कोहलीची तक्रार केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या, पण बीसीसीआयने ही बातमीही फेटाळून लावली आहे. इंग्लंड दौऱ्यावेळी वाद झाल्यामुळे विराटने अचानक टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याचंही सांगितलं गेलं. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: R ashwin, Team india, Virat kohli