मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाही मुंबईचा महत्त्वाचा खेळाडू, यांना मिळणार संधी!

IPL 2021 : पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाही मुंबईचा महत्त्वाचा खेळाडू, यांना मिळणार संधी!

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. यावर्षीचा पहिला सामना गतविजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांच्यात होणार आहे.

  • Published by:  Shreyas

चेन्नई, 5 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. यावर्षीचा पहिला सामना गतविजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांच्यात होणार आहे. या मोसमातही मुंबईची टीम तगडी असून पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यासाठीची प्रबळ दावेदार आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. मागच्या मोसमात फायनलमध्ये मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबईने 7 खेळाडूंना विकत घेतलं, पण त्यांची संभाव्य प्लेईंग-11 निश्चित मानली जात आहे. क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) पहिल्या सामन्यामध्ये खेळणार नाही, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये डिकॉक मैदानात उतरला होता, त्यामुळे त्याला 7 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. डिकॉकऐवजी मुंबई क्रिस लीनला (Chris Lynn) ओपनिंगला खेळवू शकते. बिग बॅश लीगमध्ये लीनने उत्कृष्ट कामगिरी केली होती.

सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या यांनी इंग्लंडविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली होती, त्यामुळे त्यांचीही निवड निश्चित आहे. तसंच मुंबईचा सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू असलेला कायरन पोलार्डही खेळेल. बॉलिंगची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि ट्रेन्ट बोल्ट सांभाळतील. कुल्टर नाईलला मागच्या मोसमानंतर मुंबईने रिलीज केलं, पण लिलावात पुन्हा 5 कोटी रुपयांना विकत घेतलं. बुमराह-बोल्टसोबत कुल्टर नाईलही तिसरा फास्ट बॉलर म्हणून खेळेल. स्पिनर म्हणून मुंबईकडे पियुष चावला आणि राहुल चहर या दोन लेग स्पिनरचा पर्याय आहे.

अर्जुन तेंडुलकर खेळणार?

यावर्षी मुंबईने सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) यालाही लिलावात विकत घेतलं. याआधी तो मुंबईसोबत नेट बॉलर म्हणून होता. पण यंदा त्याला खेळण्याची संधी मिळणार का नाही? असा सवाल चाहते उपस्थित करत आहेत. जर मुंबईची टीम प्ले-ऑफमध्ये लवकर पोहोचली तर शेवटच्या काही लीग मॅचमध्ये अर्जुनला खेळवलं जाऊ शकतं.

मुंबईची टीम

रोहित शर्मा, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरान पोलार्ड, कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ट्रेन्ट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, एडम मिल्ने, नॅथन कुल्टर नाइल, पियुष चावला, मार्को जेन्सन, युद्धवीर सिंग, जेम्स नीशम, अर्जुन तेंदुलकर

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians, Rohit sharma