मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, DC vs CSK : धोनीचा पुन्हा जुना अवतार, मॅच फिनिश करून चेन्नईला पोहोचवलं Final मध्ये

IPL 2021, DC vs CSK : धोनीचा पुन्हा जुना अवतार, मॅच फिनिश करून चेन्नईला पोहोचवलं Final मध्ये

आयपीएल 2021 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये (IPL 2021 Qualifier 1) चाहत्यांना पुन्हा एकदा धोनीचं (MS Dhoni) जुनं रूप दिसलं. दिल्लीविरुद्धच्या (CSK vs DC) सामन्यात धोनीने 6 बॉलमध्ये नाबाद 18 रन करत चेन्नईला 9व्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचवलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 10 ऑक्टोबर : आयपीएल 2021 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये (IPL 2021 Qualifier 1) चाहत्यांना पुन्हा एकदा धोनीचं (MS Dhoni) जुनं रूप दिसलं. दिल्लीविरुद्धच्या (CSK vs DC) सामन्यात धोनीने 6 बॉलमध्ये नाबाद 18 रन करत चेन्नईला 9व्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचवलं आहे. दिल्लीने दिलेल्या 173 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. फॉर्ममध्ये असलेला फाफ डुप्लेसिस फक्त 1 रन करून आऊट झाला, पण ऋतुराज गायकवाडने एका बाजूने किल्ला लढवला. ऋतुराजने 50 बॉलमध्ये 70 रनची खेळी केली, तर रॉबिन उथप्पाने 44 बॉलमध्ये 63 रन केले. दिल्लीकडून टॉम करनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर एनरिच नॉर्किया आणि आवेश खानला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

आयपीएल 2021 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला (CSK vs DC) विजयासाठी 173 रनचं आव्हान दिलं होतं. दिल्लीचा ओपनर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) 34 बॉलमध्ये 60 रन केले, यामध्ये 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता, तर कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) 35 बॉलमध्ये नाबाद 51 रन केले. शिमरन हेटमायरनेही 37 रनची महत्त्वाची खेळी केली. चेन्नईकडून जॉश हेजलवूडला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर रवींद्र जडेजा, मोईन अली आणि ड्वॅन ब्राव्होला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी धोनीने टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, तर दिल्लीने रिपल पटेलऐवजी टॉम करनला खेळवलं आहे. आयपीएलच्या लीग स्टेजमध्ये दिल्लीची टीम पहिल्या क्रमांकावर आणि चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर होती. दिल्लीने पहिल्या राऊंडमध्ये 14 पैकी 10 मॅच जिंकल्या, तर चेन्नईने 14 पैकी 9 सामन्यांमध्ये यश मिळवलं.

या विजयासह चेन्नईची टीम आयपीएल प्ले-ऑफमध्ये पोहोचली आहे, तर दिल्लीच्या टीमला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी आहे. आरसीबी आणि कोलकाता यांच्यात एलिमिनेटरचा सामना होणार आहे. या सामन्यात ज्या टीमचा विजय होईल, ते दिल्लीविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळतील. या मॅचमध्ये जी टीम विजयी होईल ती फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळेल.

First published:

Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021