मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: पंजाबची बॅटींग पुन्हा फेल, हैदराबादच्या जाळ्यात अडकले दिग्गज!

IPL 2021: पंजाबची बॅटींग पुन्हा फेल, हैदराबादच्या जाळ्यात अडकले दिग्गज!

पंजाब किंग्जची (Punjab Kings) या स्पर्धेतील (IPL 2021) निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये केएल राहुलसह पंजाबच्या टॉप ऑर्डर्सनं निराशा केली.

पंजाब किंग्जची (Punjab Kings) या स्पर्धेतील (IPL 2021) निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये केएल राहुलसह पंजाबच्या टॉप ऑर्डर्सनं निराशा केली.

पंजाब किंग्जची (Punjab Kings) या स्पर्धेतील (IPL 2021) निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये केएल राहुलसह पंजाबच्या टॉप ऑर्डर्सनं निराशा केली.

चेन्नई, 21 एप्रिल: पंजाब किंग्जची (Punjab Kings) या स्पर्धेतील (IPL 2021) निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. या आयपीएलमधील 14 व्या मॅचमध्ये पंजाबची लढत सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध होत आहे. या मॅचमध्ये पंजाबचा कॅप्टन के.एल. राहुल (KL Rahul) याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या बॅट्समन्सना या निर्णयाचा फायदा घेता आला नाही.

पंजाबची सुरुवात खराब झाली. कॅप्टन केएल राहुल फक्त 4 रन काढून आऊट झाला. त्याला भुवनेश्वर कुमारनं आऊट केलं. पंजाब या धक्क्यातून सावरण्यापूर्वी मयंक अग्रवाल (22) रनवर आऊट झाला. वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनची (Nicholas Pooran) निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. ख्रिस गेल सोबत रन काढताना त्याचा गोंधळ उडाला त्यामुळे तो एकही बॉल न खेळता शून्यावर रन आऊट झाला. या आयपीएलमध्ये चार पैकी 3 मॅचमध्ये पूरन शून्यावर आऊट झाला आहे.

पूरन आऊट झाल्यानं अनुभवी ख्रिस गेलवर (Chris Gayle) मोठी जबाबदारी होती. गेलचा अडथळा दूर करण्यासाठी डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) राशिद खानच्या (Rashid Khan) हातात बॉल दिला. राशिदनं पहिल्याच ओव्हरमध्ये गेलला आऊट केलं. त्यानंतर दीपक हुडालाही मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं. तो 13 रन काढून आऊट झाला. हुडाला अभिषेक शर्मानं आऊट केलं. बिग बॅश लीग विजेत्या टीमचा कॅप्टन मोईसेस हेनरिक्सनं बुधवारी पंजाब किंग्जकडून पदार्पण केलं. या पहिल्या मॅचमध्ये त्यानंही निराशा केली. तो 14 रन काढून रन आऊट झाला. त्यामुळे 14 व्या ओव्हरमध्येच पंजाबची अवस्था 6 आऊट 82 झाली होती.

रोहित शर्माचा जबरदस्त सिक्स पाहून रितिका-नताशासह मुंबईची गर्ल्स गँग थक्क

 फेबियन एलन आणि मोईसेस हेन्रीस या दोन विदेशी खेळाडूंचा पंजाबनं समावेश केला आहे. तर हैदराबाच्या टीममध्ये अनुभनी केन विल्यमसनचा समावेश करण्यात आला आहे. तसंच केदार जाधव ऑरेंज आर्मीकडून खेळत आहे. या मॅचमध्ये दोन्ही टीममध्ये तीन बदल करण्यात आले आहेत.

First published:

Tags: IPL 2021, Kl rahul, Punjab kings, Sunrisers hyderabad