• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : यशस्वीची बेस्ट खेळी, अर्शदीपच्या 5 विकेट, पहिले तीन दिवस युवा खेळाडूंचाच धमाका!

IPL 2021 : यशस्वीची बेस्ट खेळी, अर्शदीपच्या 5 विकेट, पहिले तीन दिवस युवा खेळाडूंचाच धमाका!

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडमध्ये (IPL 2021) युवा खेळाडूंची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. पंजाब आणि राजस्थान (Punjab Kings vs Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यातही तरुण खेळाडूच चमकले.

 • Share this:
  दुबई, 21 सप्टेंबर : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडमध्ये (IPL 2021) युवा खेळाडूंची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. पंजाब आणि राजस्थान (Punjab Kings vs Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यातही तरुण खेळाडूच चमकले. 19 वर्षांच्या यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) या सामन्यात 49 रनची खेळी केली. आयपीएल करियरमधली जयस्वालची ही सर्वोत्तम खेळी आहे. तर पंजाबचा फास्ट बॉलर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने 5 विकेट घेतल्या. या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर राजस्थानने 185 रन केले. यशस्वी जयस्वालने 36 बॉलचा सामना करून 49 रन केले, यामध्ये 6 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता, पण त्याला करियरमधलं पहिलं अर्धशतक करता आलं नाही. याआधीच्या 11 टी-20 मॅचमध्ये जयस्वालला 19 च्या सरासरीने फक्त 209 रन करता आले होते. 40 रन त्याचा सर्वोत्तम स्कोअर होता. लिस्ट ए करियरमध्ये त्याची कामगिरी चांगली झाली. मुंबईकडून खेळताना यशस्वीने 21 मॅचमध्ये 52 च्या सरासरीने 987 रन केले, यात 3 शतकं आणि 4 अर्धशतकं आहेत. पंजाबच्या अर्शदीप सिंग याने 4 ओव्हरमध्ये 32 रन देऊन 5 विकेट घेतल्या. अर्शदीप याचीही आयपीएल करियरमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. ऋतुराजच्या नाबाद 88 रन 19 सप्टेंबरला या मोसमाच्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात झाली. चेन्नईचा ओपनर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने टीमच्या खराब सुरुवातीनंतरही मुंबईच्या (Mumbai Indians vs CSK) बॉलिंगवर आक्रमण केलं. ऋतुराजने 58 बॉलमध्ये नाबाद 88 रन केले, यात 9 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. ऋतुराजच्या या खेळीमुळे चेन्नईने मुंबईचा 20 रनने पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात शुभमन गिलने (Shubhaman Gill) आरसीबीविरुद्ध (RCB vs KKR) 34 बॉलमध्ये 48 रन केले. गिलने त्याच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि एक सिक्स मारली. केकेआरने या मॅचमध्ये आरसीबीचा 9 विकेटने पराभव केला.
  Published by:Shreyas
  First published: