• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : फिटनेससाठी रोज 30 मिनीटं धावत स्टेशनवर जायचा, आता आयपीएलमध्ये पदार्पण!

IPL 2021 : फिटनेससाठी रोज 30 मिनीटं धावत स्टेशनवर जायचा, आता आयपीएलमध्ये पदार्पण!

इशान पोरेलचं आयपीएलमध्ये पदार्पण

इशान पोरेलचं आयपीएलमध्ये पदार्पण

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या 32 व्या सामन्यात पंजाब आणि राजस्थानच्या (Punjab Kings vs Rajasthan Royals) टीम एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. या दोन्ही टीमकडून एकाच दिवशी 4 जणांनी आयपीएलमध्ये पदार्पण केलं, पण सगळ्यांचं लक्ष बंगालकडून स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या फास्ट बॉलर इशान पोरेलवर (Ishan Porel IPL Debut) होतं.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या 32 व्या सामन्यात पंजाब आणि राजस्थानच्या (Punjab Kings vs Rajasthan Royals) टीम एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. या दोन्ही टीमकडून एकाच दिवशी 4 जणांनी आयपीएलमध्ये पदार्पण केलं, पण सगळ्यांचं लक्ष बंगालकडून स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या फास्ट बॉलर इशान पोरेलवर (Ishan Porel IPL Debut) होतं. 23 वर्षांचा इशान पोरेल बंगालच्या अंडर-16, अंडर-19 टीमकडून खेळला, तसंच त्याला भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप टीममध्येही जागा मिळाली. वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर पोरेलला बंगालच्या सिनीयर टीममध्येही संधी मिळाली, पण कोलकात्याच्या चंदन नगरपासून ते आयपीएलपर्यंतचा इशान पोरेलचा प्रवास सोपा राहिला नाही. इशानने 2017 साली 19 व्या वर्षी बंगालकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पणाची संधी मिळाली होती. विदर्भाविरुद्धच्या त्या सामन्यात बंगालचा 10 विकेटने पराभव झाला होता. असं असलं तरी ज्युनियर सिलेक्शन कमिटी मैदानात बसून हा सामना बघत होती. त्यावेळी 2018 अंडर-19 वर्ल्ड कप टीम निश्चित करण्याचं काम सुरू होतं. इशान पोरेलच्या फिटनेसबाबत निवड समिती साशंक होती, कारण 19 व्या वर्षीच पोरेलला साईड स्ट्रेन, लिगामेंट इन्ज्युरी आणि गुडघ्याची दुखापत झाली होती. तरी त्याच्या बॉलिंगची चर्चा सुरू होती. निवड समितीने पोरेलला पहिल्या दिवशी 22 ओव्हर टाकताना बघितलं. दुसऱ्या दिवशीही लंच ते टी ब्रेकपर्यंत तो लागोपाठ बॉलिंग करत होता. आपल्या पहिल्याच रणजी मॅचमध्ये पोरेलने निवड समितीला प्रभावित केलं. 35 डिग्री तापमानात पोरेलने पहिल्या इनिंगमध्ये 138 पैकी 47 ओव्हर केल्या. मॅचमध्ये त्याने 139 रन देऊन 4 विकेट पटकावल्या. यानंतर पोरेलची अंडर-19 चॅलेंजर ट्रॉफीसाठी निवड झाली, यानंतर त्याला वर्ल्ड कप टीममध्ये निवडण्यात आलं. फेब्रुवारी 2018 साली वर्ल्ड कप विजेता बनून पोरेल न्यूझीलंडहून भारतात परतला. रणजी ट्रॉफीच्या सामन्यात निवड समितीने पोरेलकडे लक्ष दिलं नसतं, तर कदाचित तो इथपर्यंत पोहोचू शकला नसता. सचिन-सौरवसारखं बनण्याचं स्वप्न इशान पोरेल कोलकात्यापासून 50 किमी लांब असलेल्या चंदननगर भागात राहतो. आपल्या शहरातून त्याने क्लब क्रिकेटला सुरुवात केली. 2012 साली तो पहिल्यांदा कोलकात्यात ट्रायलसाठी आला होता. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीला पाहून त्यालाही बॅट्समन व्हायचं होतं. ट्रायलमध्ये त्याने बॅटिंगही केली, पण कॅम्पमधल्या कोचने त्याची शरीरयष्टी पाहून फास्ट बॉलर बनण्याचा सल्ला दिला. इकडूनच पोरेलच्या करियरला कलाटणी मिळाली. फिटनेसवर काम 2014 साली इशान पोरेल एनसीए म्हणजेच नॅशनल क्रिकेट अॅकेडमीमध्ये गेला. तिकडे त्याला कमी वजनाचा मानलं जायचं, तसंच त्याच्या बॉलिंग एक्शनवरही प्रश्न उपस्थित झाले. यानंतर एक वर्ष त्याने फिटनेसवर काम केलं. एसी जीममध्ये जायच्याऐवजी त्याने घरापासून ते स्टेशनपर्यंत रोज 30 मिनीटं धावायला सुरुवात केली. धावताना त्याच्या खांद्यावर किट बॅगही असायची. स्टेशनवर जाऊन तो हावड्याला जाण्यासाठी ट्रेन पकडायचा आणि मग बसने सॉल्ट लेक किंवा इडन गार्डनला जायचा. पोरेलला 22 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 61 विकेट मिळाल्या. तर 19 टी-20 मध्ये त्याच्या नावावर 29 विकेट आहेत.
  Published by:Shreyas
  First published: