मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : रोहित शर्मा भडकला, मैदानातच अंपायरला घातली शिवी, VIDEO VIRAL

IPL 2021 : रोहित शर्मा भडकला, मैदानातच अंपायरला घातली शिवी, VIDEO VIRAL

IPL 2021 शुक्रवारी पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबईवर 9 विकेट आणि 14 बॉल राखून विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अर्धशतक केलं. रोहित शर्माच्या या अर्धशतकी खेळीमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

चेन्नई, 24 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) गतविजेत्या मुंबईची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. पहिल्या 5 सामन्यांपैकी फक्त दोन सामन्यांमध्येच मुंबईला विजय मिळवता आला, तर उरलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. शुक्रवारी पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबईवर 9 विकेट आणि 14 बॉल राखून विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अर्धशतक केलं, पण तरीही मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्माच्या या अर्धशतकी खेळीमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित अंपायरला शिवी देताना दिसत आहे.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर राहुलने मोइसेस हेनरिक्सच्या हातात बॉल दिला. पाचव्याच बॉलला अंपायर शमसुद्दीन यांनी रोहितला आऊट दिलं. हेनरिक्सने लेग साईडला टाकलेला बॉल रोहितने फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल विकेट कीपर केएल राहुलच्या हातात गेला, यानंतर पंजाबच्या टीमने अपील केलं, तेव्हा शमसुद्दीन यांनी रोहित आऊट असल्याचं सांगितलं. यानंतर लगेच रोहितने अपशब्द वापरले आणि डीआरएस घेतला.

डीआरएसमध्ये रोहित शर्मा आऊट नसल्याचं स्पष्ट झालं आणि अंपायरला त्याचा निर्णय बदलावा लागला. रोहितने या सामन्यात 52 बॉल खेळून 63 रन केले. रोहितच्या अर्धशतकानंतरही मुंबईला 20 ओव्हरमध्ये फक्त 131 रनच करता आल्या.

'ही खेळपट्टी बॅटिंगसाठी खराब नव्हती, आम्ही रन केल्या नाहीत. पंजाबने 9 विकेट राखून विजय मिळवला, ते आपण पाहिलं. आमच्या बॅटिंगमध्ये काही गोष्टी कमी पडत आहेत. 150-160 रन केले असते तरी तुम्ही लढू शकता. पंजाबच्या बॉलर्सनी पॉवर-प्लेमध्ये चांगली बॉलिंग केली,' असं रोहित शर्मा मॅच संपल्यानंतर म्हणाला.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians, Rohit sharma