मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : आयपीएलच्या ठिकाणांवरून ही टीम झाली नाराज, BCCI कडेच मागितलं स्पष्टीकरण

IPL 2021 : आयपीएलच्या ठिकाणांवरून ही टीम झाली नाराज, BCCI कडेच मागितलं स्पष्टीकरण

यंदाच्या वर्षाची आयपीएल (IPL 2021) आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अजूनपर्यंत स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झालेली नसली, तरी आयपीएलच्या ठिकाणांवरून मात्र आता वाद सुरू झाला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 मार्च : यंदाच्या वर्षाची आयपीएल (IPL 2021) आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अजूनपर्यंत स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झालेली नसली, तरी आयपीएलच्या ठिकाणांवरून मात्र आता वाद सुरू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदाची स्पर्धा ठराविक ठिकाणांवरच होणार आहे. मागच्या वर्षी स्पर्धेचं आयोजन युएईमध्ये करण्यात आलं होतं. यंदा मात्र स्पर्धा भारतातच खेळवण्याचा बीसीसीआयचा (BCCI) मानस आहे, यासाठी काही ठराविक ठिकाणं बीसीसीआयच्या मनात आहेत, पण आयपीएलची पंजाबची (Punjab Kings) टीम यावरून नाराज झाली आहे. याबाबत त्यांनी बीसीसीआयकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. यंदाची आयपीएल 11 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय मुंबई, कोलकाता, बँगलोर, चेन्नई, दिल्ली आणि अहमदाबादमध्ये आयपीएलचं आयोजन करू शकते. पण यावरून पंजाब टीमचे सहमालक नेस वाडिया नाराज झाले आहेत. या ठिकाणांमधून आम्हाला का बाहेर ठेवण्यात आलं, असा सवाल आपण बीसीसीआयला विचारला असल्याचं नेस वाडिया यांनी सांगितलं.

'आम्हाला बाहेर का ठेवलं गेलं. आम्हाला याचं कारण कळलं पाहिजे. अशा प्रकारचा निर्णय कोणत्या प्रक्रियेतून घेण्यात आला?,' असं नेस वाडिया म्हणाले. दुसरीकडे तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांनीही हैदराबादमध्ये आयपीएल मॅच व्हाव्यात, अशी मागणी केली आहे. मोठ्या शहरांच्या तुलनेत हैदराबादमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. सरकार आयपीएलच्या आयोजनाला पूर्ण पाठिंबा देईल. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीननेही रामा राव यांचं म्हणणं योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हैदराबाद बीसीसीआयचे नियम आणि बायो बबलसोबत आयपीएल खेळवण्यात सक्षम आहे, असं अजहरुद्दीनने सांगितलं.

मुंबईमध्ये कोरोना रुग्ण वाढत असतानाही या ठिकाणाचा आयपीएल खेळवण्यासाठी विचार होत आहे, त्यामुळे अन्य टीम यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. जर एक किंवा दोन ठिकाणी आयपीएलचं आयोजन होत असेल, तर टीमना काहीच आक्षेप नाही.

मागच्याच महिन्यात आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठीचा लिलाव झाला. राजस्थान रॉयल्सने या लिलावात सर्वाधिक रक्कम खर्च करून दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर क्रिस मॉरिसला 16 कोटी 25 लाखांची किंमत देऊन विकत घेतलं. याचसोबत मॉरिस आयपीएल इतिहासातला सगळ्यात महाग खेळाडू बनला.

First published: