मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : गेल-चहलचा शर्टलेस PHOTO, पंजाबचा बँगलोरवर निशाणा

IPL 2021 : गेल-चहलचा शर्टलेस PHOTO, पंजाबचा बँगलोरवर निशाणा

आपली पहिली आयपीएल ट्रॉफी (IPL 2021) जिंकण्याचं स्वप्न घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्सने शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB vs Punjab Kings) 34 रननी पराभव केला. यानंतर पंजाब किंग्सने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये क्रिस गेल (Chris Gayle) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) शर्टलेस दिसत आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 1 मे : आपली पहिली आयपीएल ट्रॉफी (IPL 2021) जिंकण्याचं स्वप्न घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्सने शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB vs Punjab Kings) 34 रननी पराभव केला. यानंतर पंजाब किंग्सने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये क्रिस गेल (Chris Gayle) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) शर्टलेस दिसत आहेत. या फोटोवरून पंजाबने बँगलोरवर निशाणा साधला. क्रिस गेल आणि युझवेंद्र चहल या फोटोमध्ये त्यांची बॉडी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा फोटो पंजाब आणि बँगलोरच्या मॅचची कहाणी सांगतो, असं कॅप्शन पंजाबने या फोटोला दिलं.

पंजाबचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul)I या सामन्यात नाबाद 91 रनची शानदार खेळी केली, त्यामुळे पंजाबने 20 ओव्हरमध्ये 179 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना बँगलोरला 20 ओव्हरमध्ये 145 रनच करता आले. यानंतर पंजाबने गेल आणि चहलचा फोटो शेयर केला. चहल आणि गेलच्या बॉडीमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे, पंजाबने या फोटोमधून मॅचमध्येही दोघांच्या बॉडीएवढंच अंतर होतं, हे सांगण्याचा प्रयत्न केला.

केएल राहुलने 57 बॉलमध्ये नाबाद 91 रन केले, यामध्ये 7 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. तर गेलने 24 बॉलमध्ये 46 रनची खेळी केली. गेलने 6 फोर आणि 2 सिक्स मारले. 180 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या बँगलोरकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 35 रन केले, तर रजत पाटीदार आणि हर्षल पटेलने 31-31 रनचं योगदान दिलं. हरप्रीत ब्रारने 19 रन देऊन 3 मोठ्या विकेट घेतल्या. ब्रारने विराट, एबी आणि मॅक्सवेल यांना माघारी धाडलं. याशिवाय बिष्णोईने 17 रन देऊन 2 विकेट घेतल्या. मेरेडिथ, मोहम्मद शमी आणि क्रिस जॉर्डन यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. बँगलोरचा या मोसमातला हा दुसरा पराभव आहे, तर पंजाबचा 7 सामन्यांमधला हा तिसरा विजय होता.

First published:
top videos

    Tags: Chris gayle, Cricket, IPL 2021, Punjab kings, RCB, Yuzvendra Chahal