Home /News /sport /

IPL 2021 : पंजाबला धक्का, केएल राहुल रुग्णालयात दाखल, टेस्टमध्ये समोर आली धक्कादायक माहिती

IPL 2021 : पंजाबला धक्का, केएल राहुल रुग्णालयात दाखल, टेस्टमध्ये समोर आली धक्कादायक माहिती

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) संघर्ष करणाऱ्या पंजाब किंग्सना (Punjab Kings) आणखी एक धक्का बसला आहे. कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    अहमदाबाद, 2 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) संघर्ष करणाऱ्या पंजाब किंग्सना (Punjab Kings) आणखी एक धक्का बसला आहे. कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रात्री केएल राहुलच्या पोटात दुखत होतं, यानंतर त्याला औषधं देण्यात आली, यानंतरही त्याला बरं वाटत नसल्यामुळे राहुलला इमर्जन्सी रूममध्ये नेण्यात आलं, तिकडे त्याच्यावर टेस्ट करण्यात आला. या टेस्टमध्ये त्याला तीव्र ॲपेंडिक्स (appendicitis) झाल्याचं समोर आलं. यावर उपचारासाठी केएल राहुलवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंजाब किंग्सने केएल राहुल याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. केएल राहुल नसताना पंजाबच्या नेतृत्वाची जबाबदारी कोणावर देण्यात येईल, याबाबत अजून टीमकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची टीम पाचव्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 7 पैकी 3 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला असून 4 सामने त्यांनी गमावले आहेत. पंजाबचा आणखी एक महत्त्वाचा खेळाडू मयंक अग्रवालही (Mayank Agarwal) दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नाही, त्यामुळे पंजाबला आता हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या या मोसमात केएल राहुल हा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. 7 मॅचमध्ये त्याने 66.20 ची सरासरी आणि 136.21 च्या स्ट्राईक रेटने 331 रन केले आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, Kl rahul, Punjab kings

    पुढील बातम्या