मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : पंजाब किंग्सचा 'पाकिस्तान स्टाईल' गोंधळ, रन आऊट कोण? थर्ड अंपायरही चक्रावला

IPL 2021 : पंजाब किंग्सचा 'पाकिस्तान स्टाईल' गोंधळ, रन आऊट कोण? थर्ड अंपायरही चक्रावला

आयपीएलमध्ये (IPL 2021) पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यातल्या सामन्यात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि दीपक हुडा (Deepak Hooda) हे दोन्ही बॅट्समन एकाच क्रीजवर आले

    अहमदाबाद, 2 मे : रन काढतानाचा गोंधळ आणि त्यातून उद्भवलेला रन आऊट म्हणलं की क्रिकेट रसिकांच्या समोर पाकिस्तानी क्रिकेटपटू समोर येतात. पण आयपीएलमध्ये (IPL 2021) पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यातल्या सामन्यात हा असाच अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि दीपक हुडा (Deepak Hooda) हे दोन्ही बॅट्समन एकाच क्रीजवर आले, यानंतर रन आऊट नेमकं कोणं झालं याचा निर्णय देताना थर्ड अंपायरही चक्रावला. 14 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर मयंकने शिमरन हेटमायरच्या (Shimron Hetmyer) दिशेने बॉल मारला आणि तो रन काढायला धावला, पण दीपक हुडा मयंकऐवजी बॉलकडेच लक्ष देत होता. हेटमायरने बॉल अडवला का नाही हे हुडा पाहत होता. तो सुरूवातीला रन काढण्यासाठी पुढे आला, पण हेटमायरने बॉल अडवल्याचं पाहून हुडा मागे फिरला. हे सगळं होत असताना मयंक नॉन स्ट्रायकर एन्डला येऊन पोहोचला. यानंतर हेटमायरने अक्षर पटेलकडे थ्रो दिला आणि त्यानेही बॉल स्टम्पला लावला. नेमका मयंक अग्रवाल रन आऊट झाला का दीपक हुडा याचा निर्णय घेताना थर्ड अंपायरलाही वेळ लागला, अखेर दीपक हुडाला रन आऊट देण्यात आलं. 1 बॉलमध्ये 1 रन करून हुडा आऊट झाला. या सामन्याआधी पंजाब किंग्सला मोठा धक्का बसला. केएल राहुल (KL Rahul) याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे मयंक अग्रवालला पंजाबच्या टीमचं नेतृत्व देण्यात आलं. शनिवारी रात्री केएल राहुलच्या पोटात दुखत होतं, यानंतर त्याला औषधं देण्यात आली, यानंतरही त्याला बरं वाटत नसल्यामुळे राहुलला इमर्जन्सी रूममध्ये नेण्यात आलं, तिकडे त्याच्यावर टेस्ट करण्यात आला. या टेस्टमध्ये त्याला तीव्र ॲपेंडिक्स (appendicitis) झाल्याचं समोर आलं. यावर उपचारासाठी केएल राहुलवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंजाब किंग्सने केएल राहुल याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. आयपीएलच्या या मोसमात केएल राहुल हा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. 7 मॅचमध्ये त्याने 66.20 ची सरासरी आणि 136.21 च्या स्ट्राईक रेटने 331 रन केले आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, IPL 2021, Punjab kings

    पुढील बातम्या