मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणार वर्ल्ड चॅम्पियन स्पिनर, कुंबळेने दिली संधी

IPL 2021 : आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणार वर्ल्ड चॅम्पियन स्पिनर, कुंबळेने दिली संधी

पंजाब किंग्समध्ये वर्ल्ड चॅम्पियन लेग स्पिनर

पंजाब किंग्समध्ये वर्ल्ड चॅम्पियन लेग स्पिनर

जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलआधी (IPL 2021) पंजाब किंग्सने (Punjab Kings) आपल्या टीममध्ये वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूला संधी दिली आहे. पंजाब किंग्सने इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीदला (Adil Rashid) टीममध्ये घेतलं आहे.

    मुंबई, 26 ऑगस्ट : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलआधी पंजाब किंग्सने (Punjab Kings) आपल्या टीममध्ये वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूला संधी दिली आहे. पंजाब किंग्सने इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीदला (Adil Rashid) टीममध्ये घेतलं आहे. आपल्या गुगलीसाठी प्रसिद्ध असलेला रशीद पहिल्यांदाच आयपीएल खेळणार आहे. आयपीएल 2021 च्या लिलावामध्ये कोणत्याच टीमने रशीदला विकत घेतलं नव्हतं. आता झाय रिचर्डसनऐवजी पंजाबने त्याला संधी दिली आहे. आदिल रशीदसोबत ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर नॅथन एलिसही पंजाबकडून खेळेल. एलिसला रिले मेरिडिथऐवजी टीममध्ये घेण्यात आलं आहे. एलिस नवीन बॉलर असला तरी रशीदने टी-20 मध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. टी-20 क्रमवारीमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. 2019 साली इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकवून देण्यातही रशीदने महत्त्वाची भूमिका बजावली होती. वर्ल्ड कपमध्ये त्याने 11 विकेट घेतल्या होत्या. आदिल रशीदचं करियर 33 वर्षांच्या आदिल रशीदने टी-20 मध्ये 65 आणि वनडेमध्ये 159 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने इंग्लंडकडून 19 टेस्ट मॅचही खेळल्या आहेत, ज्यात त्याला 60 विकेट मिळाल्या. आदिल रशीदला 201 टी-20 मॅच खेळण्याचा अनुभव आहे. टी-20 ब्लास्टमध्ये तो खूप क्रिकेट खेळला. टी-20 मध्ये त्याला एकूण 232 विकेट मिळाल्या. यात त्याचा इकोनॉमी रेटही 7.43 एवढा कमी होता. आदिल रशीदसह पंजाबच्या टीममध्ये मुरुगन अश्विन आणि रवी बिष्णोई हे लेग स्पिनरदेखील आहेत. पंजाब किंग्सकडून रशीदचे साथीदार डेव्हिड मलान आणि क्रिस जॉर्डनही खेळतात.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, Punjab kings

    पुढील बातम्या