IPL 2021, MI vs PBKS : मुंबईचा संघर्ष सुरूच, आता पंजाबनेही हरवलं

IPL 2021, MI vs PBKS : मुंबईचा संघर्ष सुरूच, आता पंजाबनेही हरवलं

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला (IPL 2021) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघर्ष सुरूच आहे. पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबईचा 9 विकेटने पराभव केला आहे. मुंबईने विजयासाठी ठेवलेलं 132 रनचं आव्हान पंजाबने 17.4 ओव्हरमध्येच पूर्ण केलं.

  • Share this:

चेन्नई, 23 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला (IPL 2021) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघर्ष सुरूच आहे. पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबईचा 9 विकेटने पराभव केला आहे. मुंबईने विजयासाठी ठेवलेलं 132 रनचं आव्हान पंजाबने 17.4 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. पंजाबला शेवटच्या तीन ओव्हरमध्ये विजयासाठी 17 रनची गरज होती, पण राहुल (KL Rahul) आणि गेल (Chris Gayle) यांनी बोल्टच्या (Trent Boult) 4 बॉलमध्येच हे आव्हान पार केलं. पंजाबकडून केएल राहुलने नाबाद 60 आणि क्रिस गेलने नाबाद 43 रन केले, तर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) 25 रनवर आऊट झाला. मुंबईकडून राहुल चहरला (Rahul Chahar) एकमेव विकेट मिळाली. त्याआधी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians vs Punjab Kings) बॅटिंग पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरली. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईला 20 ओव्हरमध्ये फक्त 131 रन करता आल्या आहेत. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) टॉस जिंकून मुंबईला पहिले बॅटिंगला बोलावलं, यानंतर ओपनर क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला इशान किशन (Ishan Kishan) स्वस्तात माघारी परतला. पण रोहितने (Rohit Sharma) सूर्यकुमार यादवसोबत (Suryakumar Yadav) पार्टनरशीप करून मुंबईचा डाव सावरला. रोहित शर्माने 52 बॉलमध्ये 63 रन आणि सूर्यकुमार यादवने 27 बॉलमध्ये 33 रन केले. सूर्यकुमार यादवची विकेट गेल्यानंतर मुंबईच्या बॅटिंगचा संघर्ष सुरू झाला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) 1 रनवर आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) 3 रनवर आऊट झाला. पंजाबकडून मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर दीपक हुडा आणि अर्शदीप सिंगला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

पंजाबने त्यांच्या टीममध्ये एक बदल केला आहे. मुरुगन अश्विनऐवजी (Murugan Ashwin) लेग स्पिनर रवी बिष्णोईला (Ravi Bishnoi) संधी देण्यात आली आहे. तर मुंबईने मात्र टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. आजही रोहितची टीम फक्त तीन परदेशी खेळाडू घेऊन खेळत आहे.

पंजाबविरुद्धच्या या पराभवानंतरही मुंबई चौथ्या क्रमांकावर कायम आहे, तर पंजाबची टीम पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. मुंबई आणि पंजाबने 5 पैकी 2 सामने जिंकले असून 3 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

Published by: Shreyas
First published: April 23, 2021, 7:11 PM IST

ताज्या बातम्या