Home /News /sport /

IPL 2021 : पंजाबच्या विजयामुळे नवा ट्वीस्ट, मुंबई इंडियन्सच्या स्वप्नाला मोठा धक्का!

IPL 2021 : पंजाबच्या विजयामुळे नवा ट्वीस्ट, मुंबई इंडियन्सच्या स्वप्नाला मोठा धक्का!

आयपीएल प्ले-ऑफच्या (IPL Play Off) रेसमध्ये आता नवा ट्वीस्ट आला आहे. पंजाब किंग्सने केलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या (PBKS vs CSK) पराभवामुळे प्ले-ऑफची शर्यत आता आणखी चुरसीची झाली आहे.

    दुबई, 7 ऑक्टोबर : आयपीएल प्ले-ऑफच्या (IPL Play Off) रेसमध्ये आता नवा ट्वीस्ट आला आहे. पंजाब किंग्सने केलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या (PBKS vs CSK) पराभवामुळे प्ले-ऑफची शर्यत आता आणखी चुरसीची झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सने दिलेलं 135 रनचं आव्हान पंजाबला 14 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं, तरचं पंजाब नेट रनरेटमध्ये मुंबईच्या (Mumbai Indians) पुढे जाणार होती. केएल राहुलच्या (KL Rahul) वादळी खेळीमुळे पंजाबने हे आव्हान 13 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. सीएसकेविरुद्धच्या या विजयामुळे पंजाबची टीम आता पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईच्या वर म्हणजेच पाचव्या क्रमांकावर गेली आहे. दिल्ली, चेन्नई आणि बँगलोरच्या टीमने आधीच प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे, तर चौथ्या स्थानासाठी कोलकाता, पंजाब, मुंबई आणि राजस्थान यांच्यात स्पर्धा आहे. कोलकाता, पंजाब आणि मुंबई यांचे आता 12 पॉईंट्स (IPL Points Table) आहेत, पण पंजाबच्या हातात आता एकही मॅच शिल्लक नाही, तर दुसरीकडे कोलकाता आणि मुंबई यांची प्रत्येकी 1 मॅच शिल्लक आहे. कोलकात्याचा राजस्थानविरुद्ध आणि मुंबईचा हैदराबादविरुद्ध पराभव झाला तर पंजाबच्या टीमला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळेल. पंजाबने दिलेल्या 135 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना केएल राहुलने आक्रमक बॅटिंग केली. राहुल 42 बॉलमध्ये 98 रनवर नाबाद राहिला, त्याच्या या खेळीमध्ये 8 सिक्स आणि 7 फोरचा समावेश होता. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर दीपक चहरला एक विकेट मिळाली. या सामन्यात पंजाबने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि सुरुवातीपासूनच चेन्नईला धक्के दिले. फाफ डुप्लेसिसने 55 बॉलमध्ये 76 रनची खेळी केली, त्यामुळे चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 134/6 पर्यंत मजल मारता आली. अर्शदीप सिंग आणि क्रिस जॉर्डनला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर रवी बिष्णोईला एक विकेट घेण्यात यश आलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, Kl rahul, Punjab kings

    पुढील बातम्या