Home /News /sport /

IPL 2021: लाजीरवाण्या कामगिरीचा फोटो शेअर करुन पूरन म्हणाला, 'मी पुन्हा येणार'

IPL 2021: लाजीरवाण्या कामगिरीचा फोटो शेअर करुन पूरन म्हणाला, 'मी पुन्हा येणार'

पंजाब किंग्जचा (Punjab Kings) बॅट्समन निकोलस पूरन (Nicholas Pooran) याच्यासाठी हा आयपीएल सिझन (IPL 2021) खराब गेला. पूरननं या खराब कामगिरीचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे.

    मुंबई, 7 मे : पंजाब किंग्जचा (Punjab Kings) बॅट्समन निकोलस पूरन (Nicholas Pooran)  याच्यासाठी हा आयपीएल सिझन (IPL 2021) खराब गेला. मागच्या आयपीएलमध्ये 25 सिक्स लगावणारा पूरन या सिझनमध्ये 6 पैकी 4 इनिंगमध्ये शून्यावर आऊट झाला.  या खराब कामगिरीमुळे पंजाबनं खेळलेल्या शेवटच्या मॅचमध्ये त्याला टीममधील जागा देखील गमवावी लागली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धच्या मॅचमध्ये पूरन चौथ्यांदा शून्यावर आऊट झाला. त्या मॅचमध्ये पूरनचा वेस्ट इंडिजमधील ज्येष्ठ सहकारी ख्रिस गेलनं (Chris Gayle) फक्त 24 बॉलमध्ये 4 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 46 रन काढले होते. गेल आऊट झाल्यानंतर पूरनकडून पंजाबला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो पुन्हा शून्यावर आऊट झाला. काइल जेमिसनच्या बॉलिंगवर शाहबाज अहमदनं त्याचा कॅच पकडला यापूर्वी निकोलस पूरन राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध पहिल्याच बॉलवर आऊट झाला होता. त्याला ख्रिस मॉरीसनं (Chris Morris) आऊट केलं. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध तो 2 बॉल मैदानावर टिकला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध तिसऱ्या मॅचमध्ये त्यानं पहिला रन काढला. दिल्लीविरुद्धही त्याला कमाल करता आली नाही. तो दिल्ली विरुद्ध फक्त 9 रन काढून आऊट झाला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये पूरननं निराशा केली. हैदराबाद विरुद्ध तर एकही बॉल न खेळता रन आऊट झाला. डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) थेट थ्रो करत त्याला रन आऊट केलं.  निकोलस पूरननं या आयपीएलमध्ये 6 इनिंगमध्ये 4.66 च्या सरासरीनं 28 रन काढले असून 19 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर आहे. सतत संधी देऊनही शून्यच्या चक्रात अडकलेल्या पूरनला अखेर पंजाबनं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये वगळण्यात आलं. या लाजीरवाण्या पूरनची जिद्द कमी झालेली नाही. त्यानं स्वत:च्याच कामगिरीचा फोटो ट्विटरवर शेअर करत 'मी पुन्हा येणार' असल्याचे संकेत दिले आहेत. "ही स्पर्धा स्थगित करण्याचं कारण वेदनादायी असलं तरी आवश्यक होतं.आयपीएल लवकरच आपली भेट होईल. मी हा फोटो मला प्रेरणा मिळावी म्हणून शेअर करत आहे. मी पूर्वीपेक्षा अधिक जोमाने परत येईन. सर्वांनी सुरक्षित राहवं,' असं ट्विट पूरननं केलं आहे. इंग्लडंची महिला क्रिकेटपटू केट क्रॉसने CSK ची जर्सी घालून मानले आभार, पाहा काय म्हणाली... पूरनचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. या ब्रेकचा फायदा घेत  पूरन उर्वरित आयपीएलमध्ये जोमानं पुनरागमन करेल अशी आशा क्रिकेट फॅन्सनी व्यक्त केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Photo viral, Punjab kings, Tweet

    पुढील बातम्या