• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL झाली नाही तर, टीम इंडियाच्या दिग्गज क्रिकेटपटूला T20 वर्ल्ड कपमधून डच्चू!

IPL झाली नाही तर, टीम इंडियाच्या दिग्गज क्रिकेटपटूला T20 वर्ल्ड कपमधून डच्चू!

खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे यंदाची आयपीएल (IPL 2o21) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपसाठी (T-20 World Cup) टीमची निवड करताना निवड समितीपुढे मोठी अडचण निर्माण होणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 मे : खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे यंदाची आयपीएल (IPL 2o21) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. 29 सामने खेळल्यानंतर आता आयपीएलचे 31 सामने उरले आहेत, पण हे सामने कधी खेळवण्यात येणार याबाबत अजून बीसीसीआयने (BCCI) काहीही सांगितलेलं नाही. आयपीएल रद्द झाली तर बीसीसीआयला 2500 कोटी रुपयांचं नुकसान होईल, असं अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला. त्यामुळे बीसीसीआय आयपीएल घेण्यासाठी इच्छूक आहे. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) पहिल्या आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमधल्या कामगिरीमुळे टीम इंडियाच्या निवड समितीला टी-20 वर्ल्ड कपसाठी (T-20 World Cup) टीम निवड करणं सोपं झाल असतं, पण आता आयपीएल झाली नाही तर निवड समितीपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळणारा लेग स्पिनर राहुल चहर (Rahul Chahar) याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 7 सामन्यांमध्ये राहुलने 11 विकेट घेतल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या 29 सामन्यांमध्ये राहुल चहर सर्वाधिक विकेट घेणारा स्पिनर आहे. आंतरराष्ट्रीय करियरमध्येही राहुल चहर 3 सामने खेळला आहे, यात त्याला 3 विकेट मिळाल्या. इंग्लंडविरुद्धच्या 5 टी-20 मॅचमधल्या शेवटच्या 2 सामन्यांमध्ये राहुलला संधी मिळाली होती, यातल्या एका सामन्यात त्याने शानदार बॉलिंग करत 2 विकेट घेतल्या होत्या. टीम इंडियाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची कामगिरी मात्र दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये पहिल्या 3 सामन्यांमध्ये चहलला संधी मिळाली होती, यात त्याला 3 विकेट मिळाल्या होत्या, पण त्याने रनही बऱ्याच दिल्या. आयपीएलमध्येही 7 मॅचमध्ये त्याला फक्त 4 विकेट घेता आल्या. तसंच त्याचा इकोनॉमी रेटही 8 पेक्षा जास्त होता. आयपीएलच्या उरलेल्या मॅच झाल्या नाहीत, तर युझवेंद्र चहलची टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड होणं कठीण आहे. टी-20 वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात किंवा युएईमध्ये होणार आहे. इथल्या खेळपट्ट्या स्पिन बॉलिंगसाठी अनुकूल आहेत. युझवेंद्र चहलने 48 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 62 विकेट घेतल्या. चहल हा भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 विकेट घेणारा बॉलर आहे. तर बुमराह 59 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  Published by:Shreyas
  First published: