Home /News /sport /

IPL 2021 : KKR चा हैदराबादवर विजय, मुंबईसाठी Play off ची रेस झाली आणखी कठीण!

IPL 2021 : KKR चा हैदराबादवर विजय, मुंबईसाठी Play off ची रेस झाली आणखी कठीण!

फोटो सौजन्य : IPL/Twitter

फोटो सौजन्य : IPL/Twitter

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये मुंबईसाठी प्ले-ऑफची शर्यत आता आणखी कठीण झाली आहे, कारण कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादवर (KKR vs SRH) 6 विकेटने विजय मिळवला आहे.

    दुबई, 3 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये मुंबईसाठी प्ले-ऑफची शर्यत आता आणखी कठीण झाली आहे, कारण कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादवर (KKR vs SRH) 6 विकेटने विजय मिळवला आहे. हैदराबादने दिलेलं 116 रनचं आव्हान केकेआरने 19.4 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पूर्ण केलं. शुभमन गिलने (Shubhaman Gill) 51 बॉलमध्ये सर्वाधिक 57 रन केले, तर नितीश राणाने 25 रनची खेळी केली. दिनेश कार्तिक 18 रनवर नाबाद राहिला. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर राशिद खान आणि सिद्धार्थ कौलला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या सामन्यामध्ये हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण त्यांना मोठा स्कोअर करता आला नाही. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून फक्त 115 रन केले. केन विलियमसनने 26, अब्दुल समदने 25 आणि प्रियम गर्गने 21 रन केले. कोलकात्याकडून टीम साऊदी, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर शाकिब अल हसनला एक विकेट घेण्यात यश आलं. प्ले-ऑफची रेस हैदराबादविरुद्धच्या या विजयाबरोबरच कोलकात्याचे 13 मॅचमध्ये 6 विजय आणि 7 पराभवांसह 12 पॉईंट्स झाले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर चौथ्या क्रमांकावर आहे. तसंच त्यांचा नेट रन रेटही +0.294 इतका आहे. कोलकात्याच्या या विजयामुळे पंजाबचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न संपुष्टात आलं आहे. तर राजस्थान आणि मुंबईसाठीही प्ले-ऑफ गाठणं आता कठीण होऊन बसलं आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबईने 12 पैकी 5 सामने जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात प्रत्येकी 10-10 पॉईंट्स आहेत. राजस्थानचा नेट रन रेट -0.337 एवढा आहे, तर मुंबईचा नेट रन रेट -0.453 आहे. याच नेट रन रेटमुळे राजस्थान सहाव्या आणि मुंबई सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईसाठी गणित काय? मुंबईचे उरलेले दोन सामने आता राजस्थान आणि हैदराबादविरुद्ध आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवणं गरजेचं आहे. मुंबईने दोन्ही सामने जिंकले आणि कोलकात्याचा राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला तर मुंबई प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवू शकते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, KKR, SRH

    पुढील बातम्या