मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: हर्षल पटेलचं 'ऑफ कटर'चं हत्यार ठरतंय धारदार! यामुळे ठरतोय यशस्वी

IPL 2021: हर्षल पटेलचं 'ऑफ कटर'चं हत्यार ठरतंय धारदार! यामुळे ठरतोय यशस्वी

IPL 2021 गाजवणाऱ्या नावांपैकी एक आहे हर्षल पटेल. त्यानं आतापर्यंत 10 मॅचेसमध्ये केवळ 50 रन्स देऊन 23 विकेट्स घेतल्या असून, पर्पल कॅपच्या स्पर्धेत तो अग्रभागी आहे

IPL 2021 गाजवणाऱ्या नावांपैकी एक आहे हर्षल पटेल. त्यानं आतापर्यंत 10 मॅचेसमध्ये केवळ 50 रन्स देऊन 23 विकेट्स घेतल्या असून, पर्पल कॅपच्या स्पर्धेत तो अग्रभागी आहे

IPL 2021 गाजवणाऱ्या नावांपैकी एक आहे हर्षल पटेल. त्यानं आतापर्यंत 10 मॅचेसमध्ये केवळ 50 रन्स देऊन 23 विकेट्स घेतल्या असून, पर्पल कॅपच्या स्पर्धेत तो अग्रभागी आहे

    नवी दिल्ली, 27 सप्टेंबर: आयपीएल 2021मध्ये (IPL 2021) हर्षल पटेल (Harshal Patel) सातत्यानं विके्टस (maximum Wickets in IPL) घेत असून, ही गोष्ट किरकोळ किंवा निव्वळ योगायोग मानता येणार नाही. त्याने एका दिवसापूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमविरुद्ध हॅट्ट्रिक (Hattrick) केली आणि यूएईमध्ये 7 सामन्यांनंतर आपल्या आरसीबी संघाला पहिला विजय मिळवून दिला. जवळपास 2 वर्षांनंतर एखाद्या खेळाडूनं आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक केली. या सीझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या (Bowlers) यादीत तो पहिल्या स्थानावर आहे. हर्षलनं आतापर्यंत 10 मॅचेसमध्ये केवळ 50 रन्स देऊन 23 विकेट्स घेतल्या असून, पर्पल कॅपच्या स्पर्धेत तो अग्रभागी आहे. दुसऱ्या स्थानावर असलेला दिल्ली कॅपिटल्सचा बॉलर आवेश खान आणि हर्षल पटेल यांच्यात केवळ 8 विकेट्सचं अंतर आहे. या सीझनमध्ये हर्षल पटेल एवढा यशस्वी होण्याचं कारण काय? एकही बॅट्समन त्याच्या बॉलिंगचा सामना करू शकत नाही का?

    आयपीएल 2021मध्ये शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये हर्षलपेक्षा अधिक विकेट्स एकाही बॉलरनं घेतलेल्या नाहीत. टीम इंडियातली सर्वांत महत्त्वाची वेगवान बॉलर्सची जोडी म्हणजे जसप्रीत बुमराह (14) आणि मोहम्मद शमी (13) हेदेखील हर्षलच्या तुलनेत पिछाडीवर आहेत. हे आकडे पाहता हर्षल पटेल या लीगमध्ये तरी जसप्रीत आणि शमीपेक्षा वरचढ ठरत आहे, असं म्हणण्यास काहीच हरकत नाही. कारण या दोघांनी 10 मॅचेसमध्ये जेवढ्या विकेट्स घेतल्या आहेत, त्यापेक्षा अधिक विकेट्स हर्षलच्या खात्यात असून, त्याचा स्ट्राइक रेटही (Strike Rate) सर्वोत्तम आहे. तो या सीझनमध्ये प्रत्येक 9 बॉल्समध्ये विकेट घेत आहे. या सीझनमध्ये हर्षलनं नेमकं काय केलं, की त्याची बॉलिंग पूर्णपणे बदलली आणि बॅट्समन त्याच्यासमोर संघर्ष करताना दिसत आहेत.

    महेंद्रसिंह धोनीची झोप उडवणारा 'हा' बॉलर ठरणार टीम इंडियाचं ट्रम्प कार्ड

    हा सीझन थोडा बाजूला ठेवला, तर तसं हर्षलचं आयपीएलमधलं करिअर चढ-उतारांनी भरलेलं आहे. त्याचा हा 9 वा आयपीएल सीझन आहे. यापूर्वीच्या 8 सीझन्समध्ये त्याने 48 मॅचेसमध्ये 46 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 10 च्या आसपास राहिला आहे. हे रेकॉर्ड पाहता तो एक वेगळा बॉलर आहे किंवा त्याच्यात काही एक्स फॅक्टर आहे, असं अजिबात वाटत नाही. कारण त्याच्याकडे पेस नाही. तो 135 किमीपेक्षा जास्त वेगात बॉलिंग करू शकत नाही. परंतु, तो आउट स्विंग बॉलिंग कशी करायची हे जाणतो. वेग कमी असल्यानं टी-20 फॉरमॅटमध्ये तो फारसा प्रभावी ठरत नसल्याचं चित्र आहे.

    डिविलियर्सनं केली विराटची नक्कल, मुंबईला हरवल्यानंतर RCB चं सेलिब्रेशन VIDEO

    2015 वगळता गेल्या काही सीझनमध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. असं असताना याच सीझनमध्ये तो एवढी धमाकेदार बॉलिंग कशी करतोय हा प्रश्न कायम राहतो.

    हर्षल स्लो बॉलचा उत्तम वापर करतोय

    अचूक लाइन आणि लेंग्थव्यतिरिक्त हर्षलने या सीझनमध्ये त्याच्या यॉर्करमध्ये (Yorker) चांगली सुधारणा केली आहे. याशिवाय तो ऑफ कटरचा (Off Cuter) वापर एखाद्या हत्याराप्रमाणे करत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यानं सलग 3 चेंडूत 3 विकेट घेतल्यानं यावरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो. हे तीनही स्लोअर बॉल होते. त्याचा यॉर्कर कधीही ऑफ स्टंप सोडत नाही. त्यामुळे बॅट्समन त्याच्याविरुद्ध जागा तयार करून रॅम्प किंवा पिक अप शॉट खेळू शकत नसल्याचं चित्र आहे.

    हर्षलचा वेग कमी आहे. त्यामुळं स्लोअर बॉलवर बॅटिंग करणं अवघड ठरतं. तसंच यूएईतलं पिच (Pitch) संथ असल्यानं त्याचे स्लोअर बॉल्स अधिकच घातक ठरत आहेत. त्यामुळे बॅट्समनला हर्षलच्या ऑफ कटरवर शॉट मारण्यासाठी जास्त ताकद लावावी लागते. या प्रयत्नात बॅट्समन फसतो आणि एलबीडब्ल्यू होतो अन्यथा बॉल बॅटवर न येता तीस यार्ड सर्कल किंवा त्याबाहेर जाऊन कॅच आउट होतो.

    ऑफ कटर हे हर्षलचं सर्वांत मोठं हत्यार

    हर्षलचं सर्वांत प्रभावी हत्यार म्हणजे ऑफ कटर आहे. तो अॅक्शन, रिस्ट पोझिशन किंवा रिलीज पॉइंटमध्ये बदल न करता बॉलिंग करू शकतो. अशा परिस्थितीत बॉल पृष्ठभागावर मजबूत पकड बनवतो आणि बॅट्समनच्या नजीक येऊन थांबतो. हर्षल ऑफ कटर टाकताना वेगात फारसा बदल करत नाही. (सरासरी 132 किमी ते 115 किमी प्रतितास) परंतु, ओव्हर स्पिनमुळे चेंडू उसळतो आणि तो बॅट्समनसाठी अडचणीचा ठरतो. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मॅचपूर्वी त्याने ज्या 19 विकेट्स घेतल्या होत्या, त्यापैकी किमान 9 विकेट्स या ऑफ कटरमुळं मिळाल्या होत्या.

    First published:
    top videos

      Tags: IPL 2021, RCB