मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : कोणत्या टीमकडे किती पैसे शिल्लक? या खेळाडूंना डच्चू?

IPL 2021 : कोणत्या टीमकडे किती पैसे शिल्लक? या खेळाडूंना डच्चू?

आयपीएल (IPL 2021) च्या टीमना 21 जानेवारीपर्यंत कायम ठेवलेल्या आणि सोडून दिलेल्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे, असं आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. ब्रिजेश पटेल यांनी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची ऑनलाईन बैठक घेतली, या बैठकीत आयपीएलच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली.

पुढे वाचा ...

मुंबई, 8 जानेवारी : आयपीएल (IPL 2021) च्या टीमना 21 जानेवारीपर्यंत कायम ठेवलेल्या आणि सोडून दिलेल्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे, असं आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. ब्रिजेश पटेल यांनी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची ऑनलाईन बैठक घेतली, या बैठकीत आयपीएलच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. भारताचे माजी टेस्ट क्रिकेटपटू पटेल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं, 'खेळाडूंच्या लिलावाची तारीख अजून ठरलेली नाही. 21 जानेवारीपर्यंत टीमना खेळाडू रिटेन करता येतील, तसंच 4 फेब्रुवारीला ट्रेडिंग विन्डो बंद होईल.'

ट्रेडिंग विन्डोमध्ये टीमना खेळाडू अदलाबदली करता येतील. यावर्षी खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

लिलावात बजेट वाढणार नाही

आठ आयपीएल टीमना खेळाडूंना विकत घेण्यासाठी 85 कोटी रुपये असतील. यावर्षी या बजेटमध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याचं ब्रिजेश पटेल यांनी सांगितलं. चेन्नईच्या टीमकडे मागच्या लिलावानंतर फक्त 15 लाख रुपये बाकी आहेत. पण केदार जाधव आणि पियुष चावला या महागड्या खेळाडूंना सोडून देऊन चेन्नई बजेट वाढवेल, असं बोललं जातंय.

कोणत्या टीमकडे किती पैसे?

मुंबईच्या टीमला त्यांच्या सगळ्या खेळाडूंना रिटेन करण्याची गरज आहे, कारण या टीमचं संतुलन चांगलं आहे. मुंबईच्या टीमकडे सध्या 1 कोटी 95 लाख रुपये आहेत. हे बजेट आणखी वाढवण्यासाठी मुंबईची टीम काही खेळाडूंना सोडू शकतं. तर राजस्थानच्या टीमकडे सर्वाधिक 14 कोटी 75 लाख रुपये शिल्लक आहेत. हैदराबादकडे लिलावाआधीच 10 कोटी 10 लाख रुपये आहेत. दिल्लीकडे 9 कोटी, कोलकात्याकडे 8 कोटी 50 लाख, बँगलोरकडे 6 कोटी 40 लाख रुपयांची रक्कम शिल्लक आहे.

IPL कुठे होणार?

या वर्षाची आयपीएल कुठे होणार, याबाबत एक महिन्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. देशातली कोरोनाची स्थिती कशी आहे, हे पाहिल्यानंतरच आयपीएल भारतात खेळवायची का नाही, याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे. कोरोना व्हायरसमुळे मागच्या वर्षाची आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात आली होती. यावेळीही भारतात स्पर्धा झाली नाही, तर युएईचा पर्याय बीसीसीआयकडे आहे.

First published: