मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, KKR vs RR : राजस्थान एवढ्या ओव्हरमध्ये जिंकली तर मुंबई Play Off मध्ये!

IPL 2021, KKR vs RR : राजस्थान एवढ्या ओव्हरमध्ये जिंकली तर मुंबई Play Off मध्ये!

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या आता अखेरच्या काही मॅच राहिल्या आहेत, पण अजूनही प्ले-ऑफची (IPL Play Off) चौथी टीम ठरलेली नाही.

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या आता अखेरच्या काही मॅच राहिल्या आहेत, पण अजूनही प्ले-ऑफची (IPL Play Off) चौथी टीम ठरलेली नाही.

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या आता अखेरच्या काही मॅच राहिल्या आहेत, पण अजूनही प्ले-ऑफची (IPL Play Off) चौथी टीम ठरलेली नाही.

  • Published by:  Shreyas

शारजाह, 7 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या आता अखेरच्या काही मॅच राहिल्या आहेत, पण अजूनही प्ले-ऑफची (IPL Play Off) चौथी टीम ठरलेली नाही. दिल्ली (DC), चेन्नई (CSK) आणि आरसीबीने (RCB) प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे, तर कोलकाता, पंजाब आणि मुंबई या रेसमध्ये अजूनही कायम आहेत. राजस्थानची टीमही यात असली तरी याची शक्यता अत्यंत कमी आहे. हैदराबादची टीम आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे.

प्ले-ऑफचं गणित

कोलकाता (KKR), पंजाब (Punjab Kings) आणि मुंबईच्या (Mumbai Indians) खात्यात सध्या 12 पॉईंट्स आहेत, पण पंजाबच्या टीमच्या सगळ्या 14 मॅच झाल्या आहेत. तर कोलकाता आणि मुंबईच्या टीमची प्रत्येकी एक मॅच राहिली आहे. कोलकात्याची टीम राजस्थानविरुद्ध आणि मुंबई शुक्रवारी हैदराबादविरुद्ध खेळणार आहे.

पंजाबच्या टीमचा अखेरचा सामना चेन्नईविरुद्ध झाला. चेन्नईने दिलेलं 136 रनचं आव्हान पंजाबला 14 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं, ज्यामुळे ते नेट रन रेटमध्ये मुंबई इंडियन्सच्या पुढे जाणार होते. केएल राहुलच्या (KL Rahul) वादळी खेळीमुळे पंजाबने हे आव्हान 13 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. पॉईंट्स टेबलमध्ये आता कोलकाता चौथ्या, पंजाब पाचव्या आणि मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे.

मुंबईला आता चौथ्या क्रमांक गाठायचा असेल तर राजस्थानला कोलकात्याने दिलेलं आव्हान 9 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागणार आहे. राजस्थानने हे आव्हान 9 ओव्हरमध्ये पूर्ण केलं तर पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई चौथ्या क्रमांकावर जाईल. तसंच राजस्थानने 9 ओव्हरमध्ये हे आव्हान पार केलं नाही, पण त्यांचा या सामन्यात विजय झाला तर मुंबईला हैदराबादचा शुक्रवारी पराभव करावा लागेल, तरं मुंबईची टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकते. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

राजस्थानची टीम

यशस्वी जयस्वाल, लियाम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, मुस्तफिजुर रहमान

कोलकात्याची टीम

शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयन मॉर्गन, दिनेश कार्तिक, शाकीब अल हसन, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती

First published:

Tags: IPL 2021, KKR, Mumbai Indians, Rajasthan Royals