मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : यंदा '12' चा आकडाच ठरणार मॅजिक नंबर! 4 टीम रेसमध्ये

IPL 2021 : यंदा '12' चा आकडाच ठरणार मॅजिक नंबर! 4 टीम रेसमध्ये

आयपीएल 2021 (IPL 2021) आता अंतिम टप्प्यावर आलं आहे. लीग स्टेजच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्येक मॅच टीमसाठी करो या मरो असणार आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (Mumbai Indians vs Rajasthan Royals) यांच्यात आज होणारा मुकाबलाही तसाच आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 5 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) आता अंतिम टप्प्यावर आलं आहे. लीग स्टेजच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्येक मॅच टीमसाठी करो या मरो असणार आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (Mumbai Indians vs Rajasthan Royals) यांच्यात आज होणारा मुकाबलाही तसाच आहे. या सामन्यात विजय मिळवणारी टीम प्ले-ऑफच्या (IPL Play Off) शर्यतीत कायम राहिल, कारण विजेत्या टीमचे 12 पॉईंट्स होतील. आयपीएलचा इतिहास आपण बघितला तर चौथी टीम 14 पॉईंट्सवर प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवते, पण यंदा मात्र 12 पॉईंट्सवरच एखादी टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकते.

आयपीएल 2021 मध्ये 56 लीग मॅच होणार आहेत, यातल्या 50 मॅच झाल्या आहेत. यानंतर दिल्ली 20, चेन्नई 18 आणि बँगलोर 16 पॉईंट्ससह प्ले-ऑफमध्ये पोहोचली आहे. आता या तीन टीममध्ये टॉप-2 मध्ये राहण्यासाठी स्पर्धा आहे, कारण पहिल्या दोनमध्ये राहिलं तर टीमला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतात.

4 टीममध्ये प्ले-ऑफची रेस

चौथ्या स्थानासाठी कोलकाता, मुंबई, राजस्थान आणि पंजाब यांच्यात रेस आहे. कोलकात्याचे 13 मॅचमध्ये 12 पॉईंट्स आहेत. तर मुंबई आणि राजस्थानने 12-12 मॅच खेळून 10 पॉईंट्स मिळवले आहेत. म्हणजेच कोलकाता, मुंबई आणि राजस्थान जास्तीत जास्त 14 पॉईंट्सवर जाऊ शकतात, तसंच पंजाब 12 पॉईंट्सच्या पुढे जाऊ शकणार नाही, पण तरीही पंजाबला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे, यासाठी कोलकाता, मुंबई आणि राजस्थानला एक-एक मॅच गमवावी लागेल, यानंतर नेट रनरेटवर पंजाबचं भवितव्य ठरेल.

मुंबई इंडियन्सचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. मुंबईची टीम राजस्थानविरुद्ध आज आणि हैदराबादविरुद्ध 8 ऑक्टोबरला खेळेल. जर मुंबई दोन मॅच जिंकली तर त्यांचे 14 पॉईंट्स होतील. पण हैदराबादविरुद्ध मुंबईचा पराभव झाला, तर 12 पॉईंट्ससह एखादी टीम प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय होईल. मुंबईच्या आजच्या मॅचमध्ये विजय आणि हैदराबादविरुद्ध पराभव झाला आणि राजस्थानने 7 ऑक्टोबरला कोलकात्याला हरवलं आणि याच दिवशी पंजाबनेही चेन्नईला पराभूत केलं तर चारही टीम 12 पॉईंट्सवर राहतिल. अशा परिस्थितीमध्ये मुंबई, कोलकाता, राजस्थान आणि पंजाब यांच्यात ज्यांचा नेट रन रेट चांगला असेल ती टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचेल.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians