Home /News /sport /

BCCI समोर डबल टेन्शन! T20 वर्ल्ड कप युएईत झाला तर IPL ला धक्का

BCCI समोर डबल टेन्शन! T20 वर्ल्ड कप युएईत झाला तर IPL ला धक्का

आयपीएल 2021 (IPL 2021) चे उरलेले 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये (UAE) खेळवण्याचा बीसीसीआयचा (BCCI) विचार आहे, पण जर टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जर युएईमध्ये खेळवला गेला, तर तिकडे आयपीएल होऊ शकणार नाही.

    मुंबई, 25 मे : आयपीएल 2021 (IPL 2021) चे उरलेले 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये (UAE) खेळवण्याचा बीसीसीआयचा (BCCI) विचार आहे, पण जर टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जर युएईमध्ये खेळवला गेला, तर तिकडे आयपीएल होऊ शकणार नाही, कारण युएई क्रिकेट बोर्डाला 1 ऑक्टोबरला सगळी स्टेडियम आयसीसीला द्यावी लागणार आहेत. बीसीसीआयने 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आयपीएल खेळवण्याची तयारी केली आहे. तर टी-20 वर्ल्ड कपला 18 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. जर आयपीएल खेळवली गेली नाही तर बीसीसीआयला 2,500 कोटी रुपयांचं नुकसान होईल, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आधीच सांगितलं आहे, त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करण्यासाठी आग्रही आहे. यंदाच्या वर्षी आयपीएलच्या 29 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं, पण खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली. इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलचे सामने युएईमध्ये आयोजित करायचे असतील, तर 700 ते 800 जणांचं लसीकरण करावं लागेल, पण ते शक्य होणार नाही. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी 1 जूनला बैठक घेणार आहे. तीन महिन्यांमध्ये 40 सामने युएईमधली तीन स्टेडियम दुबई, अबुधाबी आणि शारजाहमध्ये पुढच्या तीन महिन्यांमध्ये 40 सामने होणार आहेत. पाकिस्तान सुपर लीगचे 20 सामने अबुधाबीमध्ये होतील, याची सुरुवात 5 जूनपासून होईल. पीएसएलच्या वेळापत्रकाची मात्र अजून घोषणा करण्यात आलेली नाही. अफगाणिस्तानच्या टीमचं होम ग्राऊंड भारत आहे, पण भारतातल्या कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीमुळे त्यांनाही युएईमध्ये खेळावं लागू शकतं. सप्टेंबर महिन्यात अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये तीन वनडे मॅचची सीरिज होणार आहे, त्यामुळे स्टेडियम एक आठवड्यांसाठी व्यस्त असेल. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज होणार आहे, त्यामुळे युएई क्रिकेट बोर्डासाठी आयपीएलचं आयोजन करणं सोपं नाही. याशिवाय टी-20 वर्ल्ड कपआधी अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात तीन टी-20 सामने खेळेल. युएई क्रिकेट बोर्डाच्या सूत्राने टेलिग्राफला सांगितलं, की जर टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये खेळवला जाणार असेल, तर 1 ऑक्टोबरला आयसीसीला स्टेडियम द्यावी लागतील. या परिस्थितीत बीसीसीआयकडे श्रीलंका किंवा इंग्लंडमध्ये आयपीएल आयोजित करायचा पर्याय उपलब्ध आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड (Sri Lanka) आणि इंग्लंडमधल्या (England) चार काऊंटी क्लबने बीसीसीआयला आयपीएलचं आयोजन करण्याची ऑफर दिली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Cricket, IPL 2021, T20 world cup, UAE

    पुढील बातम्या