अहमदाबाद, 1 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या सामन्यात धमाकेदार कामगिरी केल्यानतंर पंजाब किंग्सचा (RCB vs Punjab Kings) स्पिनर हरप्रीत ब्रार (Harpreet Brar) चर्चेत आला आहे. हरप्रीतने विराट कोहली (Virat Kohli), एबी डिव्हिलियर्स (Ab de Villiers) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) या आरसीबीच्या दिग्गजांना माघारी पाठवलं, त्याआधी हरप्रीतने 17 बॉलमध्ये 25 रनची महत्त्वाची खेळी केली. हरप्रीतच्या या ऑलराऊंड कामगिरीमुळे पंजाबने बँगलोरचा पराभव केला.
आपल्या या कामगिरीमुळे चर्चेत आलेल्या हरप्रीत ब्रारचं जुनं ट्वीट पुन्हा व्हायरल झालं. हरप्रीतने पॉर्न स्टार मिया खलिफाला (Mia Khalifa) तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. 14 फेब्रुवारीला मिया खलीफाचा वाढदिवस असतो, तेव्हा ब्रारने मियाला बर्थडे विश केलं होतं.
Belated Happy Birthday @miakhalifa https://t.co/mzv5ZEeSVh
— Harpreet Brar (@thisisbrar) February 14, 2021
Harpreet Brar running to delete this tweet in innings break pic.twitter.com/a8nr8u6UXk
— Chinaman. (@DenofRohit) April 30, 2021
Brar on his way to delete the tweet in mid innings break 😂
— slick (@notbhaskarr) April 30, 2021
आयपीएल 2021 च्या (IPL 2021) 26व्या मॅचमध्ये पंजाब किंग्सने आरसीबीचा 34 रनने पराभव केला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर पंजाबने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 179 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना बँगलोरला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 145 रनच करता आले.
पंजाबचा 7 सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. 6 पॉईंट्ससह ते पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तर बँगलोरचा यंदाच्या मोसमातला हा दुसरा पराभव होता. 10 पॉईंट्ससह बँगलोर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) यानेही हरप्रीतचं कौतुक केलं आहे. हरप्रीतचं करियर घडवण्यात हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनची मोलाची भूमिका आहे, असं युवराज म्हणाला. हरप्रीतसाठी मी खूश आहे. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलची विकेट घेतली आणि इनिंगच्या शेवटी रन केले, तू टीकाकारांची तोंडं बंद केली आहेस, असं ट्वीट युवराजने केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.