मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, PBKS vs KKR : शाहरुखनेच केला कोलकात्याचा The End, मुंबईला मोठा दिलासा

IPL 2021, PBKS vs KKR : शाहरुखनेच केला कोलकात्याचा The End, मुंबईला मोठा दिलासा

शाहरुख खानची (Shahrukh Khan) फटकेबाजी आणि केएल राहुलच्या (KL Rahul) संयमी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (PBKS vs KKR) 5 विकेटने पराभव केला आहे.

शाहरुख खानची (Shahrukh Khan) फटकेबाजी आणि केएल राहुलच्या (KL Rahul) संयमी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (PBKS vs KKR) 5 विकेटने पराभव केला आहे.

शाहरुख खानची (Shahrukh Khan) फटकेबाजी आणि केएल राहुलच्या (KL Rahul) संयमी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (PBKS vs KKR) 5 विकेटने पराभव केला आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 1 ऑक्टोबर : शाहरुख खानची (Shahrukh Khan) फटकेबाजी आणि केएल राहुलच्या (KL Rahul) संयमी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (PBKS vs KKR) 5 विकेटने पराभव केला आहे. कोलकात्याने ठेवलेलं 166 रनचं आव्हान पंजाबने 19.3 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पूर्ण केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबला विजयासाठी 5 रनची गरज होती. व्यंकटेश अय्यरने सेट झालेल्या केएल राहुलची विकेट घेत पंजाबला धक्का दिला. यानंतर पंजाबला विजयासाठी 4 बॉलमध्ये 4 रनची गरज होती. तेव्हा शाहरुख खानने सिक्स मारत पंजाबला जिंकवून दिलं.

पंजाबकडून केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या ओपनिंग जोडीने 70 रनची पार्टनरशीप केली. राहुल 67 रनवर आणि मयंक 40 रनवर आऊट झाला. शाहरुख खानने 9 बॉलमध्ये नाबाद 22 रन केले, यात 2 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. कोलकात्याचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने 2 विकेट घेतल्या, तर शिवम मावी, सुनिल नारायण आणि व्यंकटेश अय्यरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

पंजाबने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. व्यंकटेश अय्यरने 49 बॉलमध्ये सर्वाधिक 67 रन केले. तर राहुल त्रिपाठीने 34 आणि नितीश राणाने 31 रन केले. पंजाबकडून अर्शदीप सिंगने 3 तर रवी बिष्णोईने 2 विकेट घेतल्या. मोहम्मद शमीला एक विकेट घेण्यात यश आलं.

मुंबईचा फायदा

कोलकात्याच्या या पराभवामुळे मुंबईला मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. या सामन्याआधी मुंबईची टीम पाचव्या क्रमांकावर होती, पण पंजाबच्या विजयानंतर रोहितची टीम सहाव्या क्रमांकावर फेकली गेली. तरीही पंजाबच्या विजयामुळे मुंबईच्या प्ले-ऑफला पोहोचण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

या सामन्यात पंजाबचा विजय झाल्यामुळे 12 सामन्यात 5 विजयांसह त्यांचे 10 पॉईंट्स झाले आहेत. म्हणजेच ते पॉईंट्सच्या बाबतीत पंजाब मुंबईसोबत आली आहे, पण त्यांच्या आता फक्त दोनच मॅच उरल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईकडे अजूनही पंजाबपेक्षा एक जास्त मॅच हातात राहिली आहे. कोलकाता आणि पंजाबने आता उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या तरी त्यांच्या खात्यात 14 पॉईंट्स होतील, तर मुंबईने उरलेल्या तिन्ही मॅच जिंकल्या तर त्यांचे 16 पॉईंट्स होतील. कोलकात्याची टीम हैदराबाद (SRH) आणि राजस्थानविरुद्ध (Rajasthan Royals) खेळणार आहे, तर मुंबईचे सामने दिल्ली, राजस्थान आणि हैदराबादविरुद्ध होणार आहेत.

First published:

Tags: IPL 2021, KKR, Punjab kings, Shahrukh khan