मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, PBKS vs DC : दिल्लीने पंजाबला धुतलं, पॉईंट्स टेबलमध्येही पोहोचले टॉपवर

IPL 2021, PBKS vs DC : दिल्लीने पंजाबला धुतलं, पॉईंट्स टेबलमध्येही पोहोचले टॉपवर

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) पंजाब किंग्सची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबचा (Punjab Kings vs Delhi Capitals) 7 विकेटने पराभव झाला आहे.

  • Published by:  Shreyas
अहमदाबाद, 2 मे : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) पंजाब किंग्सची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबचा (Punjab Kings vs Delhi Capitals) 7 विकेटने पराभव झाला आहे. पंजाबने दिलेले 167 रनचं आव्हान दिल्लीने 17.4 ओव्हरमध्येच 3 विकेट गमावून पूर्ण केलं. शिखर धवनने (Shikhar Dhawan) 47 बॉलमध्ये नाबाद 69 रन केले, तर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 22 बॉलमध्ये 39 रन करून आऊट झाला. स्मिथने 24, ऋषभ पंतने 14 आणि शिमरन हेटमायरने नाबाद 16 रनची खेळी केली. पंजाबकडून रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन आणि हरप्रीत ब्रार यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. पंजाबचा पराभव करत दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. दिल्लीने 8 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि 2 सामने गमावले. तर पंजाबची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. पंजाबने या मोसमात 8 पैकी 3 सामने जिंकले आणि 5 मध्ये त्यांचा पराभव झाला. पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याचं शतक फक्त एका रनने हुकलं आहे. मयंक 58 बॉलमध्ये 99 रनवर नाबाद राहिला. त्याने 4 सिक्स आणि 8 फोर मारले. मयंकच्या या खेळीमुळे पंजाबने दिल्लीला (PBKS vs DC) विजयासाठी 167 रनचं आव्हान दिलं. मयंकची खेळी सोडता पंजाबच्या दुसऱ्या कोणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. डेव्हिड मलानने 26 रन, क्रिस गेलने 13 रन आणि प्रभसिमरनने 12 रन केले. दिल्लीकडन कागिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर आवेश खान आणि अक्षर पटेलला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) संघर्ष करणाऱ्या पंजाबला (Punjab Kings) मोठा धक्का बसला. दिल्लीविरुद्धच्या (PBKS vs DC) मॅचमध्ये केएल राहुल (KL Rahul) याच्याऐवजी मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) टॉससाठी मैदानात उतरला. पोटाच्या दुखापतीमुळे केएल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्याच्याऐवजी मयंक अग्रवालला पंजाबचं नेतृत्व देण्यात आलं. पंजाबविरुद्धच्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात पंजाबने टीममध्ये दोन बदल केले, मागच्या सामन्यापर्यंत दुखापतग्रस्त असलेला मयंक अग्रवाल राहुलऐवजी टीममध्ये आला, तर फॉर्ममध्ये नसलेल्या निकोलस पूरनऐवजी (Nicholas Pooran) डेव्हिड मलानला (David Malan) संधी देण्यात आली. तर दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही.
First published:

Tags: Delhi capitals, IPL 2021, Kl rahul, Punjab kings, Rishabh pant

पुढील बातम्या