IPL स्थगित झाल्यानंतर आता घरी पोहोचला खेळाडू, प्रेगनंट गर्लफ्रेंडला मिठी मारून ढसाढसा रडला

IPL स्थगित झाल्यानंतर आता घरी पोहोचला खेळाडू, प्रेगनंट गर्लफ्रेंडला मिठी मारून ढसाढसा रडला

खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) अर्ध्यातच स्थगित करण्यात आला. स्पर्धा स्थगित तर करण्यात आली, पण ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांच्या देशातल्या कडक निर्बंधांमुळे स्वत:च्या घरी पोहोचू शकले नव्हते, आता मात्र त्यांची सुटका झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 मे : खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) अर्ध्यातच स्थगित करण्यात आला. स्पर्धा स्थगित तर करण्यात आली, पण ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांच्या देशातल्या कडक निर्बंधांमुळे स्वत:च्या घरी पोहोचू शकले नाहीत. 4 मे रोजी आयपीएल स्थगित झाल्यानंतर खेळाडूंना काही काळ मालदीवमध्ये घालवावा लागला. यानंतर ऑस्ट्रेलियाचे 38 सदस्य दोन आठवड्यांपूर्वी घरी परतले, पण घरी परतल्यानंतरही त्यांना दोन आठवडे क्वारंटाईन राहावं लागलं, त्यानंतर आता त्यांना घरी परतण्याची परवानगी मिळाली आहे.

फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) या खेळाडूंमध्ये होता. हॉटेलमधल्या क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर पॅट कमिन्सने आपल्या गरोदर गर्लफ्रेंडला मिठी मारली आणि तो ढसाढसा रडायला लागला. या भावुक क्षणाचा व्हिडिओ ऑस्ट्रेलियन क्रीडा पत्रकार अमांडा बेली यांनी ट्विटरवर शेयर केला आहे.

'दिवसातला खास व्हिडिओ. आयपीएलसाठी आठ आठवडे घराबाहेर राहिल्यानंतर पॅट कमिन्स अखेर हॉटेल क्वारंटाईनमधून बाहेर पडला आणि आपली गर्भवती गर्लफ्रेंड बेकीला भेटला. भावनांचा बांध फुटला,' असं अमांडा बेली यांनी लिहिलं.

beky boston

क्वारंटाईनमधून बाहेर पडल्यानंतर हे दोघं स्वत:च्या 70 कोटी रुपयांच्या नव्या घरात गेले. बेकीने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे.

कमिन्सशिवाय डेव्हिड वॉर्नर (David Warner), स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), ग्लेन मॅक्सवेलदेखील (Glenn Maxwell) आपल्या कुटुंबाला भेटले. वॉर्नरनेही त्याच्या कुटुंबासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला.

आयपीएलचा उरलेला मोसम आता युएईमध्ये आयोजित केला जाणार आहे. या सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू खेळणार का नाही, याबाबत अजूनही साशंकता आहे. पॅट कमिन्स याने आधीच आपण आयपीएलचा उरलेला मोसम खेळणार नसल्याचं सांगितलं आहे.

Published by: Shreyas
First published: May 31, 2021, 9:31 PM IST

ताज्या बातम्या