Home /News /sport /

IPL ला स्थगिती मिळाल्यानंतर पॅट कमिन्सने सांगितल्या आयोजनातील चुका

IPL ला स्थगिती मिळाल्यानंतर पॅट कमिन्सने सांगितल्या आयोजनातील चुका

खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानंतर यंदाची आयपीएल (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर आणि केकेआरचा (KKR) खेळाडू पॅट कमिन्स (Pat Cummins) याने महत्त्वाची कबुली दिली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 5 मे : खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानंतर यंदाची आयपीएल (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर आणि केकेआरचा (KKR) खेळाडू पॅट कमिन्स (Pat Cummins) याने महत्त्वाची कबुली दिली आहे. कोरोना महामारीच्या संकटात भारतात आयपीएलच्या आयोजनात आयोजकांकडून काही गोष्टी आणखी चांगल्या करता आल्या असत्या, असं कमिन्स म्हणाला आहे. आयपीएलचा मागचा मोसम युएईमध्ये यशस्वीरित्या पार पडला, यानंतर आयोजकांनी भारतात स्पर्धा घेण्याचं ठरवलं, पण बायो-बबलमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले, ज्यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली. मागच्यावर्षी कोरोना व्हायरसमुळे आयपीएल सुरुवातीला रद्द करण्यात आली, मग स्पर्धेचं युएईमध्ये आयोजन करण्यात आलं. मागच्यावर्षीची आयपीएल युएईमध्ये झाली आणि त्याचं आयोजन शानदार पद्धतीने झालं, असं कमिन्स फॉक्स स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला. 'यावर्षी त्यांनी एक पाऊल पुढे येत भारतातल्या काही शहरांमध्ये आयपीएलचं आयोजन करण्याचं ठरवलं. पण गोष्टी बघितल्यानंतर आयोजन आणखी चांगल्या पद्धतीने होऊ शकलं असतं. ही दोन वेगळ्या प्रकारची जग आहेत. आम्ही भाग्यवान आहोत, कारण आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही ठीक आहोत, पण इकडे लोकं उपचारासाठी संघर्ष करत आहेत. आयपीएलमध्ये आमचं खेळणं योग्य होतं का, असा प्रश्न आहे. पण सगळ्यांना तीन-चार तास विरंगुळा मिळेल, असं सगळे म्हणाले. मी जे करू शकतो, ते मी करतो आहे. भारत माझ्यासाठी आणि क्रिकेटपटूंसाठी चांगला देश आहे,' अशी प्रतिक्रिया कमिन्सने दिली. आयपीएल स्थगित झाल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवला जाऊ शकतात. ऑस्ट्रेलियाने मागच्या आठवड्यात भारतातून येणारी विमानसेवा आणि नागरिकांवर 15 मेपर्यंत बंदी घातली आहे. केकेआरचे दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy), संदीप वॉरियर (Sandeep Warrior) तसंच दिल्लीचा अमित मिश्रा (Amit Mishra), हैदराबादचा ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. चेन्नई सुपरकिंग्सचा बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी (Laxmipathi Balaji) आणि प्रशिक्षक माईक हसी (Mike Hussey) यांनाही कोरोनाची लागण झाली, त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Coronavirus, Cricket, IPL 2021, KKR

    पुढील बातम्या