Home /News /sport /

जगातली सगळ्यात मोठी लीग IPL यासाठी फेल, PSL चं रेकॉर्ड सर्वोत्तम!

जगातली सगळ्यात मोठी लीग IPL यासाठी फेल, PSL चं रेकॉर्ड सर्वोत्तम!

आयपीएल 2021 ची फायनल (IPL 2021 Final) चेन्नई आणि कोलकाता (CSK vs KKR) यांच्यात थोड्याच वेळात सुरू होणार आहे. याआधी चेन्नईने 3 वेळा तर कोलकात्याने 2 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे, म्हणजेच यंदाही आयपीएलचा नवा चॅम्पियन बघायला मिळणार नाही.

पुढे वाचा ...
    दुबई, 15 ऑक्टोबर : आयपीएल 2021 ची फायनल (IPL 2021 Final) चेन्नई आणि कोलकाता (CSK vs KKR) यांच्यात थोड्याच वेळात सुरू होणार आहे. याआधी चेन्नईने 3 वेळा तर कोलकात्याने 2 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे, म्हणजेच यंदाही आयपीएलचा नवा चॅम्पियन बघायला मिळणार नाही. आयपीएलचा इतिहास बघितला तर आतापर्यंत 13 टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या, यातल्या फक्त 6 टीमना ट्रॉफी जिंकता आली, म्हणजे अर्ध्याहून कमी टीमना आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलं आहे. जगातल्या इतर टॉप-4 लीग बघितल्या तर तिकडे 57 ते 83 टक्के टीम चॅम्पियन झाल्या आहेत. या सगळ्या लीगचं रेकॉर्ड आयपीएलपेक्षा चांगलं आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) आतापर्यंत 6 टीम खेळल्या, यापैकी 5 टीमना चॅम्पियन होता आं. जगातल्या टी-20 लीगमधलं हे सर्वोत्तम रेकॉर्ड आहे. आयपीएलची सुरुवात 2008 साली झाली होती, आजही आयपीएल जगातली सगळ्यात मोठी लीग आहे. या मोसमात 8 टीम मैदानात उतरल्या होत्या, तर आतापर्यंत 13 टीम आयपीएल खेळल्या. सध्या असलेल्या 8 टीमशिवाय डेक्कन चार्जर्स, पुणे वॉरियर्स, कोची टस्कर्स, गुजरात लायन्स आणि रायजिंग पुणे सुपर जायंट्स या टीमही आयपीएल खेळल्या. 2016 आणि 2017 साली फिक्सिंगमुळे चेन्नई आणि राजस्थानवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती, त्यावेळी सुपर जायंट्स आणि गुजरातची टीम खेळली होती. मुंबई-चेन्नईने जिंकल्या 8 ट्रॉफी आयपीएलच्या 13 मोसमांपैकी मुंबईने (Mumbai Indians) सर्वाधिक 5 वेळा तर चेन्नईला 3 वेळा आयपीएल जिंकण्यात यश आलं. चेन्नई या मोसमातही फायनलमध्ये पोहोचली आहे. याशिवाय कोलकात्याने दोन वेळा विजय मिळवला. राजस्थान, डेक्कन चार्जर्स आणि सनरायजर्स हैदराबादला एक-एक वेळा आयपीएल जिंकता आली होती. पंजाब किंग्स, आरसीबी आणि दिल्लीला अजूनही आयपीएल जिंकता आलेली नाही. PSL मध्ये 6 मोसमात 5 चॅम्पियन्स पाकिस्तान सुपर लीगची सुरुवात 2016 साली झाली. आतापर्यंत पीएसएलचे 6 मोसम झाले, यात 5 टीम चॅम्पियन झाल्या. इस्लामाबाद युनायटेडने सर्वाधिक दोन वेळा किताब जिंकला, तर वेस्ट इंडिजच्या कॅरेबियन प्रीमियर लीगची (CPL) सुरुवात 2013 साली झाली. आतापर्यंत सीपीएलचे 9 मोसम झाले, यात 7 पैकी 4 टीम चॅम्पियन झाल्या. त्रिनबागो नाईट रायडर्सने सर्वाधिक 4 वेळा स्पर्धा जिंकली. बिग बॅश लीगमध्ये 6 चॅम्पियन्स ऑस्ट्रेलियातली टी-20 लीग असलेल्या बिग बॅश लीगला (BBL) 2011-2012 साली सुरुवात झाली. या स्पर्धेचे आतापर्यंत 10 मोसम झाले असून 8 टीम खेळल्या, यापैकी 6 टीम विजयी झाल्या. पर्थ आणि सिडनीला 3-3 ट्रॉफी मिळाल्या. तर बांगलादेश प्रीमियर लीगला (BPL) 2012 साली सुरुवात झाली. 7 मोसमांमध्ये 8 टीम सहभागी झाल्या, यातल्या 5 टीमना चॅम्पियन होण्यात यश आलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, KKR

    पुढील बातम्या