Home /News /sport /

IPL 2021 साठी असा होणार खेळाडूंचा लिलाव! पाहा BCCI ची योजना

IPL 2021 साठी असा होणार खेळाडूंचा लिलाव! पाहा BCCI ची योजना

आयपीएल 2021 (IPL 2021) साठी बीसीसीआय (BCCI) मेगा ऑक्शन करण्याचा विचारात नाही. तर पुढच्या मोसमाआधी फेब्रुवारी महिन्यात खेळाडूंचा छोटा लिलाव होणार आहे.

    मुंबई, 22 डिसेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) साठी बीसीसीआय (BCCI) मेगा ऑक्शन करण्याचा विचारात नाही. तर पुढच्या मोसमाआधी फेब्रुवारी महिन्यात खेळाडूंचा छोटा लिलाव होणार आहे. याआधी आयपीएलच्या 2021 च्या मोसमात दोन नव्या टीम सहभागी होतील, असं सांगितलं जात होतं, पण आता येत असलेल्या वृत्तांनुसार पुढच्या वर्षी होणारी स्पर्धी 8 टीममध्येच खेळवली जाईल. 2022 साली दोन नवीन टीम जोडल्या जातील आणि तेव्हाच खेळाडूंचा मोठा लिलाव होईल. 24 डिसेंबरला बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे, या सभेत आयपीएलबाबत शिक्कामोर्तब केलं जाईल. इनसाईड स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं की यावेळची परिस्थिती बघता मोठा लिलाव करणं शक्य नाही, त्यामुळे फ्रॅन्चायजींसाठी मिनी ऑक्शन घेतला जाऊ शकतो. लिलावाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, बहुतेक हा लिलाव फेब्रुवारी महिन्यात होईल. आयपीएल लिलावाआधी 10 ते 31 जानेवारीदरम्यान सैय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आयपीएलच्या सगळ्या टीमची नजर या स्पर्धेच्या खेळाडूंवर असेल. यंदाच्या वर्षी मोठा लिलाव होणार नसल्यामुळे मुंबईची (Mumbai Indians) संतुलित टीम खूश असेल, पण चेन्नईच्या टीमचं (Chennai Super Kings) मात्र नुकसान होणार आहे. बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने लिलावाच्या तारखांची घोषणा केल्यानंतर फ्रॅन्चायजी खेळाडूंना रिटेन करण्याची आणि रिलीज करण्याची प्रक्रिया सुरू करेल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या