Home /News /sport /

IPL 2021 : भारतातला कोरोनाचा अनुभव सांगताना किवी क्रिकेटपटू ढसाढसा रडला

IPL 2021 : भारतातला कोरोनाचा अनुभव सांगताना किवी क्रिकेटपटू ढसाढसा रडला

खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे यावर्षीची आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. भारतातल्या कोरोनाच्या परिस्थितीचा अनुभव सांगताना न्यूझीलंडचा क्रिकेटपटू टीम सायफर्ट (Tim Seifert) याला रडू कोसळलं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 मे : खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे यावर्षीची आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. भारतातल्या कोरोनाच्या परिस्थितीचा अनुभव सांगताना न्यूझीलंडचा क्रिकेटपटू टीम सायफर्ट (Tim Seifert) याला रडू कोसळलं. भारतात असताना टीम सायफर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्याला भारतातच आयसोलेट करण्यात आलं होतं, पण न्यूझीलंडचे इतर खेळाडू चार्टर विमानाने भारतातून बाहेर पडले. आयपीएलच्या 29 मॅच झाल्या होत्या, पण बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली, यानंतर बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलमध्ये टीम सायफर्ट कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) टीममध्ये होता. स्पर्धा स्थगित झाल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू घरी जायला निघाले, पण तेव्हाच सायफर्टला कोरोनाची लक्षणं आढळून आली, यानंतर टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. सायफर्ट सध्या न्यूझीलंडमध्ये स्वत:च्या घरी होम आयसोलेशनमध्ये आहे. त्यावेळी सायफर्ट ऑनलाईन बोलत होता. आयपीएलचा आणि कोरोनाचा अनुभव सांगताना सायफर्टला अश्रू अनावर झाले. सायफर्टला चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) बॅटिंग प्रशिक्षक माइक हसीसोबत (Mike Hussey) चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 'मला जेव्हा आपल्याला कोरोना झाल्याचं कळलं, तेव्हा जगच थांबल्यासारखं मला वाटलं. पुढे काय होईल, याचा विचारही मी करू शकत नव्हतो. मी खूप घाबरलो होतो. तुम्ही वाईट गोष्टींबाबत ऐकता आणि विचार करता, की असं माझ्यासोबतही होईल. मला स्वत:ला सांभाळायला थोडा वेळ गेला,' अशी प्रतिक्रिया सायफर्टने दिली. टीम सायफर्टला कोलकात्याने मागच्या मोसमात युएसएचा फास्ट बॉलर अली खानच्या (Ali Khan) जागी टीममध्ये निवडलं होतं, यानंतर फेब्रुवारी महिन्यात लिलावाआधी त्याला रिटेन करण्यात आलं होतं. आयपीएल 2021 स्थगित होईपर्यंत त्याला एकही मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. कठीण काळामध्ये ब्रॅण्डन मॅक्कलम (Brendon Mccullum) आणि स्टीफन फ्लेमिंगने (Stephen Fleming) केलेल्या मदतीबद्दल सायफर्टने त्यांचे आभार मानले. 'त्यांनी गोष्टी सोप्या केल्या होत्या. सीएसके आणि केकेआरच्या सीईओंनी सगळं ठीक होईल, असा विश्वास दिला. जेव्हा घरी जायचं होतं, तेव्हा त्यांनी मला सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी सगळं काही केलं,' असं सायफर्ट म्हणाला. दोन महिन्यांवर लग्न आलं असल्यामुळे त्याचीही सकारात्मक मानसिकता तयार करण्यासाठी मदत मिळाल्याचं सायफर्टने सांगितलं. 'माझी होणारी बायको खूप खूश होती, कारण मी लवकर घरी आलो. लग्नाची तयारी करण्यासाठीही मी तिला मदत केली,' असं वक्तव्य सायफर्टने केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Coronavirus, Cricket, IPL 2021, KKR

    पुढील बातम्या