Home /News /sport /

IPL 2021 मध्ये खेळणार नाहीत 10 टीम, BCCI ने घेतला निर्णय

IPL 2021 मध्ये खेळणार नाहीत 10 टीम, BCCI ने घेतला निर्णय

आयपीएल (IPL 2020) चा यंदाचा मोसम संपल्यानंतर लगेचच पुढच्या मोसमाच्या तयारीला बीसीसीआय (BCCI)ने सुरुवात केली आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आणखी दोन टीम वाढतील आणि एकूण टीमची संख्या 10 होईल, असं सांगण्यात येत होतं.

    मुंबई, 22 डिसेंबर : आयपीएल (IPL 2020) चा यंदाचा मोसम संपल्यानंतर लगेचच पुढच्या मोसमाच्या तयारीला बीसीसीआय (BCCI)ने सुरुवात केली आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आणखी दोन टीम वाढतील आणि एकूण टीमची संख्या 10 होईल, असं सांगण्यात येत होतं. पण आता माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार बीसीसीआयने दोन नवीन टीम आणण्याचा निर्णय सध्या तरी टाळला आहे. आयपीएलच्या पुढच्या मोसमात 8 टीमच सहभागी होतील. टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार आयपीएल 2021 मध्ये बीसीसीआय 8 टीमच मैदानात उतरवेल. बीसीसीआयने दोन टीम वाढवण्याच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती दिली आहे. 24 डिसेंबरला बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत दोन टीम वाढवण्याबाबत निर्णय होईल, असं सांगितलं जात होतं, पण बीसीसीआयमध्येच एकमत होत नसल्याचं समोर येत आहे. इनसाईट स्पोर्ट्समध्ये आपेल्या वृत्तानुसार बीसीसीआय अधिकारी म्हणाला, 'आयपीएल 2021 साठी दोन नवीन टीम आणायला वेळ खूप कमी आहे. खासकरून खेळाडूंचा लिलावही होणार आहे. काम जास्त आहे आणि वेळ कमी आहे. आयपीएलमध्ये दोन नवीन टीम आल्या तर त्या 2022 मध्येच यायची शक्यता जास्त आहे.' इनसाईड स्पोर्ट्सच्या बातमीनुसार स्टार स्पोर्ट्स आणि बीसीसीआय यांच्यातला करार 2021 साली संपत आहे, त्यामुळे 2022 साली नव्या टीमसोबत आयपीएल सुरू होऊ शकतं. आयपीएल जर 10 टीमची झाली तर त्याची व्हॅल्यू वाढेल. तसंच 10 टीम म्हणजे 94 मॅच, सध्याच्या परिस्थितीमध्ये हे शक्य दिसत नाही. अडानी गोयंका विकत घेणार टीम? माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार अडानी ग्रुप आणि संजीव गोयंका आयपीएलची टीम विकत घेण्याच्या स्पर्धेत आहेत. अडानी यांनी आधीच आयपीएल टीम विकत घेण्याची इच्छा बोलून दाखवली होती. अहमदाबादमध्ये जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम उभारलं गेल्यानंतर त्यांची ही इच्छा आणखी वाढली आहे. तर संजीव गोयंका रायजिंग पुणे सुपरजायंट्सचे मालक होते. नव्या टीमसाठी टेंडर निघालं तर तेदेखील टीम विकत घेण्याचा विचार करत आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या