IPL 2021 : 'बॉलर यशस्वी ठरले, पण...' बोल्टने घेतली पोलार्ड-पांड्याची शाळा

IPL 2021 : 'बॉलर यशस्वी ठरले, पण...' बोल्टने घेतली पोलार्ड-पांड्याची शाळा

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबईची (Mumbai Indians) कामगिरी ठिकठाकच झाली आहे. बँगलोरविरुद्धच्या (RCB) पराभवानंतर मुंबईने कोलकाता (KKR) आणि हैदराबादविरुद्ध (SRH) विजय मिळवला, पण दिल्लीविरुद्धच्या (Delhi Capitals) सामन्यात त्यांच्या पदरी निराशा आली.

  • Share this:

चेन्नई, 22 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबईची (Mumbai Indians) कामगिरी ठिकठाकच झाली आहे. बँगलोरविरुद्धच्या (RCB) पराभवानंतर मुंबईने कोलकाता (KKR) आणि हैदराबादविरुद्ध (SRH) विजय मिळवला, पण दिल्लीविरुद्धच्या (Delhi Capitals) सामन्यात त्यांच्या पदरी निराशा आली. चार सामन्यांमध्ये दोन विजय आणि दोन पराभवांसह मुंबईच्या खात्यात सध्या चार पॉईंट्स आहेत. तसचं पॉईंट्स टेबलमध्येही मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. या चार सामन्यांमध्ये बॉलर्सनी उल्लेखनीय कामगिरी केली असली, तरी मुंबईच्या मजबूत अशा मधल्या फळीला अजिबात रन करता आले नाहीत. पुढच्या सामन्यांमध्ये बॅट्समननी जास्त रन करावे, अशी अपेक्षा मुंबई इंडियन्सचा फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्टने (Trent Boult) व्यक्त केली आहे.

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्याआधी बोलताना बोल्ट म्हणाला, 'या कामगिरीमुळे मधल्या फळीतले खेळाडू खूश नसतील, हे मला माहिती आहे. हे खेळाडू रन करण्यासाठी भुकेले आहेत. चेन्नईत आमचा हा शेवटचा सामना असेल, त्यामुळे चांगली कामगिरी करण्यासाठी ते उत्सूक आहेत.'

'आमची सुरुवात आदर्श झाली नाही. टीमने जास्त रन करावे, असं आम्हाला वाटत होतं, पण आम्ही शेवटपर्यंत आव्हान दिलं, हीच या टीमची मजबुती आहे. मॅच शेवटपर्यंत नेण्यात बॉलर यशस्वी ठरले. आता रन करण्यात आम्ही यशस्वी होऊ, ही अपेक्षा,' अशी प्रतिक्रिया बोल्टने दिली.

आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्सना एकदाही 170-180 रन करता आले नाहीत. या चारपैकी फक्त एका सामन्यात मुंबईच्या बॅट्समनला अर्धशतक करता आलं. कोलकात्याविरुद्ध सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 56 रनची खेळी केली होती. मुंबईच्या मधल्या फळीतले इशान किशन (Ishan Kishan), हार्दिक पांड्या (Hardik Pandya), कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

'बॅट्समनच्या दृष्टीकोनातून बोलणं माझ्यासाठी कठीण आहे. हार्दिक आणि पोलार्ड आमच्या टीमचे मुख्य खेळाडू आहेत. त्यांना आतापर्यंत रणनितीनुसार बॅटिंग करता आलेली नाही. ते जास्त बॉल खेळण्याबाबत विचार करत आहेत. पॉवर-प्लेमध्ये मिळत असलेल्या चांगल्या सुरुवातीचा आम्हाला फायदा घेता येईल, अशी आशा आहे,' असं वक्तव्य बोल्टने केलं.

पंजाबचे बॅट्समन धोकादायक आहेत, त्यामुळे त्यांना बॉलिंग करणं आव्हानात्मक आहे, असंही बोल्ट म्हणाला. मुंबई आणि पंजाब यांच्यात शुक्रवारी सामना होणार आहे.

Published by: Shreyas
First published: April 22, 2021, 5:12 PM IST

ताज्या बातम्या