• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : पहिल्या मॅचमध्ये मुंबईला फक्त एकाच गोष्टीची चिंता, इतिहास बदलावा लागणार

IPL 2021 : पहिल्या मॅचमध्ये मुंबईला फक्त एकाच गोष्टीची चिंता, इतिहास बदलावा लागणार

आयपीएलच्या या मोसमाला सुरूवात व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यामध्ये या मोसमातला पहिला सामना होणार आहे.

 • Share this:
  चेन्नई, 9 एप्रिल : आयपीएलच्या या मोसमाला सुरूवात व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यामध्ये या मोसमातला पहिला सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स ही आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम आहे. आतापर्यंत 5 वेळा मुंबईने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. पण मोसमाची सुरूवात चांगली करण्यात त्यांना अपयश आलं आहे. 2013 पासून जेव्हा रोहित शर्माने (Rohit Sharma) मुंबईचं नेतृत्व घेतलं तेव्हापासून त्यांना आयपीएलची पहिली मॅच कधीच जिंकता आलेली नाही. आज हा इतिहास बदलण्यासाठी मुंबईची टीम मैदानात उतरेल बँगलोर विरुद्ध मुंबई (4 एप्रिल 2013) : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या या रोमांचक सामन्यात मुंबईचा फक्त 2 रनने पराभव झाला होता. बँगलोरने या सामन्यात 20 ओव्हर बॅटिंग करून 156 रन केले होते. क्रिस गेलने (Chris Gayle) सर्वाधिक 92 रनची खेळी केली होती. मुंबईला शेवटच्या ओव्हरमध्ये 10 रनची गरज होती, तेव्हा विनय कुमारने शेवटच्या ओव्हरमध्ये अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिकची विकेट घेतली. मुंबई इंडियन्सने या मोसमात विजय मिळवला होता. कोलकाता विरुद्ध मुंबई (16 एप्रिल 2014) : कोलकात्याच्या टीमने (KKR) या सामन्यात 163 रन केले होते. जॅक कॅलिस आणि मनिष पांडे यांनी चांगली कामगिरी केली, पण कोलकात्याचे बॉलर चमकले आणि मुंबईचा 41 रननी पराभव झाला. या मोसमात चेन्नईने एलिमिनेटरमध्ये मुंबईचा पराभव केला होता. कोलकाता विरुद्ध मुंबई (8 एप्रिल 2015) : या मोसमात मुंबईने दुसऱ्यांना आयपीएल ट्रॉफी जिंकली, पण त्यांची सुरूवात नेहमीप्रमाणे खराब झाली. मुंबईने 168 रन केल्यानंतर गौतम गंभीरने अर्धशतक करत कोलकात्याला 9 बॉल आणि 7 विकेट राखून जिंकवलं पुणे विरुद्ध मुंबई (9 एप्रिल 2016) : या मोसमातही मुंबईची सुरूवात खराब झाली. पुण्याविरुद्धची मॅच मुंबईने 9 विकेटने गमावली. पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईला 100 रनचा आकडाही गाठता येणार नाही, असं वाटत होतं. पण हरभजन सिंगने 30 बॉलमध्ये 45 रनची खेळी केली. पुण्याने हे आव्हान 5 ओव्हर शिल्लक असताना पूर्ण केलं. पुणे विरुद्ध मुंबई (6 एप्रिल 2017) : 184 रन केल्यानंतरही मुंबईला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. अजिंक्य रहाणेने 34 बॉलमध्ये 60 रन तर स्मिथने 54 बॉलमध्ये 84 रनची खेळी केली. एक बॉल शिल्लक असताना पुण्याचा या सामन्यात विजय झाला. याच मोसमात फायनलमध्ये मुंबईने पुण्याला धूळ चारली. चेन्नई विरुद्ध मुंबई (7 एप्रिल 2018) : पहिले बॅटिंग करत मुंबईने 165 रन केले. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी 40 पेक्षा जास्त स्कोअर केला. पण चेन्नईने 16.3 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून सामना जिंकला. ड्वॅन ब्राव्होने 30 बॉलमध्ये 68 रनची खेळी केली होती. दिल्ली विरुद्ध मुंबई ( 24 मार्च 2019) : ऋषभ पंतने 27 बॉलमध्ये 78 रनची वादळी खेळी केली, ज्यामुळे दिल्लीने 6 विकेट गमावून 213 रन केले. दिल्लीने हा सामना 37 रनने जिंकला. युवराज सिंगने 35 बॉलमध्ये 53 रन आणि कृणाल पांड्याने 15 बॉलमध्ये 32 रन केले. या मोसमातही मुंबईने फायनलमध्ये विजय मिळवला. चेन्नई विरुद्ध मुंबई (19 सप्टेंबर 2020) : चेन्नईविरुद्धच्या या सामन्यात मुंबईने 162 रन केले. अंबाती रायुडू आणि फाफ डुप्लेसिसचं अर्धशतक आणि सॅम करनने 6 बॉलमध्ये केलेल्या 18 रनमुळे चेन्नईचा या सामन्यात विजय झाला. या मोसमातही मुंबईने फायनलमध्ये दिल्लीला पराभूत केलं.
  Published by:Shreyas
  First published: