मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : महाराष्ट्र दिन आणि कोरोना संकट, मुंबई इंडियन्सचा चाहत्यांसाठी मराठमोळा मेसेज!

IPL 2021 : महाराष्ट्र दिन आणि कोरोना संकट, मुंबई इंडियन्सचा चाहत्यांसाठी मराठमोळा मेसेज!

महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचं संकट असल्यामुळे महाराष्ट्र दिनाचे (Maharashtra Day) जवळपास सगळेच कार्यक्रम रद्द करण्यात आले. आयपीएलच्या (IPL) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या टीमने त्यांच्या चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या, सोबतच कोरोना काळात काळजी घ्यायचं आवाहनही केलं.

पुढे वाचा ...

मुंबई, 1 मे : महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचं संकट असल्यामुळे महाराष्ट्र दिनाचे (Maharashtra Day) जवळपास सगळेच कार्यक्रम रद्द करण्यात आले. आयपीएलच्या (IPL) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या टीमने त्यांच्या चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या, सोबतच कोरोना काळात काळजी घ्यायचं आवाहनही केलं. मुंबई इंडियन्सनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून खेळाडूंचा हा व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये झहीर खान (Zaheer Khan), आदित्य तरे (Aditya Tare), धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) आणि अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) हे खेळाडू चाहत्यांशी मराठीतून संवाद साधत आहेत.

मुंबई इंडियन्सच्या या व्हिडिओमध्ये मुंबईची ओळख असलेलं गेट वे ऑफ इंडिया, लोकल ट्रेन, मुंबई महापालिकेची इमारत, वानखेडे स्टेडियम, समुद्र, कयानी बेकरी, मुंबईचे डबेवाला तसंच पुणे स्टेशन, दगडुशेठ हलवाई मंदिर आणि शनिवार वाडाही दाखवण्यात आला आहे.

याचसोबत मुंबई इंडियन्सने आणखी एक व्हिडिओ शेयर केला आहे, यामध्ये कोरोनाच्या संकटात विशेष काळजी घेण्याचं आव्हन खेळाडू चाहत्यांना करत आहेत. जिकडे जात असाल तिकडे मास्क लावा, वारंवार हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा, असं आवाहन मुंबईच्या खेळाडूंनी केलं आहे, तसंच या संकटातून आपण लवकरच बाहेर पडू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपरकिंग्ससोबत होत आहे. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पहिला सामना गमावल्यानंतर पुढच्या लागोपाठ 5 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर मुंबई इंडियन्सने 6 पैकी 3 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. याआधी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या बॅट्समनना सूर गवसल्यामुळे त्यांनी दणदणीत विजय मिळला. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर मुंबई आणि चेन्नई यांच्यातला सामना खेळवला जाणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम पहिल्या आणि मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे.

First published:
top videos

    Tags: IPL 2021, Mumbai Indians