मुंबई, 18 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या (IPL 2021) 9व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादचा (Mumbai Indians vs SRH) पराभव केला. याचसोबत या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) स्वत:च्या नावावार एक खास विक्रम केला आहे. रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा भारतीय खेळाडू बनला आहे, याआधी हा विक्रम चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) नावावर होता. याचसोबत या सामन्यात रोहितने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 4 हजार रनही पूर्ण केल्या आहेत.
रोहितने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 25 बॉलमध्ये 32 रन केले, या खेळीमध्ये त्याने 2 फोर आणि 2 सिक्स लगावले. याचसोबत त्याने एमएस धोनीचं सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या भारतीय खेळाडूचं रेकॉर्ड मोडलं. रोहितने तिसऱ्या ओव्हरच्या पाचव्या बॉलला मुजीब उर रहमानला (Mujeeb Ur Rahaman) सिक्स मारली आणि धोनीच्या 216 सिक्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. यानंतर पुढच्याच ओव्हरला रोहितने भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) सिक्स मारून धोनीला मागे टाकलं.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये क्रिस गेलने (Chris Gayle) सर्वाधिक 351 सिक्स मारले आहेत. एबी डिव्हिलियर्स (Ab de Villiers) 237 सिक्ससह दुसऱ्या क्रमांकावर तर विराट कोहली (Virat Kohli) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) प्रत्येकी 201 सिक्स मारल्यामुळे पाचव्या क्रमांकावर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2021, MS Dhoni, Mumbai Indians, Rohit sharma