चेन्नई, 18 एप्रिल : कायरन पोलार्डने (Kieron Pollard) आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या (IPL 2021) 9व्या मॅचमध्ये नवा विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये 200 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड पोलार्डच्या नावावर झाला आहे. हैदराबादविरुद्धच्या (Mumbai Indians vs SRH) सामन्यात पोलार्डने 22 बॉलमध्ये 35 रनची खेळी केली, यात एक फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. पोलार्डने इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारच्या अखेरच्या दोन बॉलला दोन सिक्स मारले, त्यामुळे मुंबईने 20 ओव्हरमध्ये 150 रन केले.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम क्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर आहे. गेलने आयपीएलमध्ये 351 सिक्स मारले आहेत, तर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) 201 सिक्स लगावले आहेत, पण पोलार्डने विराटपेक्षा कमी सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये पोलार्ड 167 सामने तर विराट 194 सामने खेळला आहे. एबी डिव्हिलियर्सने (Ab de Villiers) या स्पर्धेत 237, रोहित शर्माने (Rohit Sharma) 217 आणि एमएस धोनीने (MS Dhoni) 216 सिक्स मारले आहेत.
कायरन पोलार्डने या सामन्यात 105 मीटर लांब सिक्स मारला. या मोसमातला हा सगळ्यात मोठा सिक्स होता. 17 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर ऑफ स्पिनर मुजीब उर रहमानच्या बॉलवर पोलार्डने हा गगनचुंबी शॉट मारला. याआधी आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेलने 100 मीटर लांब सिक्स मारला होता. तर मुंबईच्याच सूर्यकुमार यादवच्या नावावर 99 मीटरचा सिक्स आहे.
पोलार्डचा गगनचुंबी सिक्स, पाहा VIDEO
हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 13 रनने विजय झाला. कायरन पोलार्डने शेवटच्या दोन बॉलवर लगावलेले सिक्स मुंबईच्या विजयात महत्त्वाचे ठरले. याशिवाय हार्दिक पांड्याने डेव्हिड वॉर्नर आणि अब्दुल समदला रन आऊट केलं, त्यामुळेही सामना मुंबईच्या बाजूने फिरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2021, Kieron pollard, Mumbai Indians, SRH