मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 उद्यापासून, मुंबई-बँगलोरची टक्कर, कधी आणि कुठे पाहता येणार महामुकाबला?

IPL 2021 उद्यापासून, मुंबई-बँगलोरची टक्कर, कधी आणि कुठे पाहता येणार महामुकाबला?

जगातली सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेली आयपीएल (IPL 2021) सुरू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. शुक्रवार 9 एप्रिलपासून स्पर्धेला सुरूवात होईल. यंदाच्या वर्षी पहिला सामना गतविजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांच्यात असणार आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 8 एप्रिल: जगातली सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेली आयपीएल (IPL 2021) सुरू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. शुक्रवार 9 एप्रिलपासून स्पर्धेला सुरूवात होईल. यंदाच्या वर्षी पहिला सामना गतविजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांच्यात असणार आहे. पाचवेळा चॅम्पियन राहिलेली मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासात कायमच आरसीबीला भारी पडली आहे. आतापर्यंत या दोन्ही टीममध्ये 29 सामने झाले, यापैकी 19 वेळा मुंबईचा तर 10 वेळा बँगलोरचा विजय झाला.

लागोपाठ दुसऱ्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचे सामने प्रेक्षकांशिवाय होणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना टीव्ही आणि मोबाईलवरच सगळे सामने पाहावे लागणार आहेत. यावेळी आयपीएलच्या मॅच चेन्नई, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, कोलकाता आणि दिल्ली या 6 ठिकाणी होणार आहेत. तसंच कोणतीही टीम त्यांच्या घरच्या मैदानात खेळणार नाही.

किती वाजता सुरू होणार मॅच?

आयपीएल 2021 ची पहिली मॅच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर टॉस 7 वाजता होईल.

कुठे होणार सामना?

मुंबई आणि बँगलोर यांच्यातला पहिला सामना 9 एप्रिल शुक्रवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होईल.

कुठे पाहता येणार?

आयपीएल 2021 च्या मॅचचं प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. याशिवाय मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी+हॉटस्टारवर पाहता येईल.

बँगलोरची संपूर्ण टीम

विराट कोहली, एबी डिविलियर्स, युझवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, एडम झम्पा, शाहबाज अहमद, फिन एलेन, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, हर्षल पटेल, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत, काइल जेमीसन, डॅनियल ख्रिश्चन

मुंबईची संपूर्ण टीम

रोहित शर्मा, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ट्रेन्ट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, एडम मिल्ने, नॅथन कुल्टर नाइल, पियुष चावला, मार्को जेन्सन, युद्धवीर सिंग, जेम्स नीशम, अर्जुन तेंडुलकर

First published:
top videos

    Tags: Cricket, IPL 2021, Mumbai Indians, RCB, Rohit sharma, Sports, Virat kohli