Home /News /sport /

IPL 2021 : ...म्हणून हार्दिक पांड्याने पहिल्या सामन्यात बॉलिंग केली नाही

IPL 2021 : ...म्हणून हार्दिक पांड्याने पहिल्या सामन्यात बॉलिंग केली नाही

आयपीएलच्या (IPL 2021) पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (Mumbai Indians vs RCB) पराभव केला. मुंबईने ठेवलेल्या 160 रनच्या आव्हानाचा पाठलाग बँगलोरने शेवटच्या बॉलवर केला.

    चेन्नई, 10 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (Mumbai Indians vs RCB) पराभव केला. मुंबईने ठेवलेल्या 160 रनच्या आव्हानाचा पाठलाग बँगलोरने शेवटच्या बॉलवर केला. या सामन्यात मुंबईला सहाव्या बॉलरची कमी जाणवली. मुंबईचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) या सामन्यात बॉलिंग का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाचं मुंबईचा ओपनर क्रिस लीन (Chris Lynn) याने उत्तर दिलं आहे. 'आम्हाला सहाव्या बॉलरची कमी जाणवली. हार्दिकने बॉलिंग का केली नाही, हे मला नक्की माहिती नाही, पण बहुतेक त्याचा खांदा दुखत होता. तसंच हा हार्दिकच्या वर्क लोड मॅनेजमेंटचा भाग आहे. हार्दिक बॉलिंग टाकतो तेव्हा टीम निश्चितच संतुलित होते,' असं लीन म्हणाला. रोहित शर्माला रन आऊट केल्यानंतर मी थोडा नरवस होतो, अशी प्रतिक्रिया लीनने दिली. मुंबईचे विकेट कीपिंग सल्लागार किरण मोरे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईच्या टीमने दोन दिवस सराव केला नव्हता. 'जर एखाद्या फास्ट बॉलरला तुम्ही दोन दिवस खोलीत बंद केलंत, तर वेगळीच परिस्थिती तयार होते, पण आम्ही कारणं देऊ शकत नाही,' असं वक्तव्य लीनने केलं. मुंबई इंडियन्सने लागोपाठ 9 वेळा आयपीएलचा आपला पहिला सामना गमावला आहे. या कामगिरीमुळे आपण निराश झालो नाही, कारण चॅम्पियनशीप जिंकणं महत्त्वाचं आहे, कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सांगितलं. मॅच चांगली झाली, आम्ही त्यांना सहज जिंकू दिलं नाही, पण आम्ही केलेल्या स्कोअरनंतर खूश नव्हतो. आम्हाला 20 रन कमी पडले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Hardik pandya, IPL 2021, Mumbai Indians

    पुढील बातम्या