IPL 2021 : मुंबईपुढे बॅटिंग सुधारण्याचं चॅलेंज, पंजाबविरुद्ध हा खेळाडू पदार्पण करणार!

IPL 2021 : मुंबईपुढे बॅटिंग सुधारण्याचं चॅलेंज, पंजाबविरुद्ध हा खेळाडू पदार्पण करणार!

आयपीएलमध्ये आज (IPL 2021) मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध (Mumbai Indians vs Punjab Kings) होत आहे. यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी फार समाधानकारक झाली नाही, त्यामुळे या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) टीममध्ये बदल करू शकतो.

  • Share this:

चेन्नई, 23 एप्रिल : आयपीएलमध्ये आज (IPL 2021) मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध (Mumbai Indians vs Punjab Kings) होत आहे. यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी फार समाधानकारक झाली नाही. आरसीबीविरुद्धच्या (RCB) पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर मुंबईने कोलकाता (KKR) आणि हैदराबादविरुद्ध (SRH) विजय मिळवला, पण दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली. चार पैकी दोन विजय आणि दोन पराभवांसह मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर पंजाबला 4 सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवता आला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब शेवटून दुसऱ्या म्हणजेच सातव्या क्रमांकावर आहे.

पाच वेळची चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सच्या बॅट्समननी या मोसमात त्यांची निराशा केली आहे. चार सामन्यांमध्ये फक्त एकाच बॅट्समनला अर्धशतक करता आलं. कोलकात्याविरुद्ध सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 56 रनची खेळी केली होती. रोहित शर्माला (Rohit Sharma) आयपीएलच्या या मोसमात चांगली सुरूवात मिळाली, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तसंच इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड आणि कृणाल पांड्या यांची बॅट अजूनही शांतच आहे.

मुंबईची संघर्ष करणारी बॅटिंग बघता रोहित शर्मा या सामन्यात न्यूझीलंडच्या जेम्स नीशमला (James Neesham) संधी देऊ शकतो. ऑलराऊंडर असलेला नीशम आक्रमक बॅटिंगसह फास्ट बॉलिंगही करतो, त्यामुळे मुंबईला आणखी एका बॅट्समनचा पर्याय मिळेल. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईने फक्त तीनच परदेशी खेळाडू खेळवले होते, तसंच जयंत यादवला (Jayant Yadav) संधी दिली होती, त्यामुळे रोहितपुढे जयंत यादवऐवजी जेम्स नीशमला खेळवण्याचा पर्याय आहे. जेम्स नीशम आयपीएलच्या मागच्या मोसमात पंजाबच्या टीममध्ये होता, पण त्याला सोडून देण्यात आलं. मुंबईने नीशमला लिलावात विकत घेतलं.

मुंबईची संभाव्य टीम

रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड, जयंत यादव/ जेम्स नीशम, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट

Published by: Shreyas
First published: April 23, 2021, 6:18 PM IST

ताज्या बातम्या