• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : मुंबई-पंजाबच्या 2 खेळाडूंमध्ये टशन, जुन्या भांडणाचा बदला घेणार!

IPL 2021 : मुंबई-पंजाबच्या 2 खेळाडूंमध्ये टशन, जुन्या भांडणाचा बदला घेणार!

आयपीएलमध्ये (IPL 2021) आज मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध (Mumbai Indians vs Punjab Kings) होणार आहे. या सामन्यात चाहत्यांना मुंबईचा कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि पंजाबचा दीपक हुड्डा (Deepak Hooda) यांच्यात टशन पाहायला मिळू शकतं.

 • Share this:
  चेन्नई, 23 एप्रिल : आयपीएलमध्ये (IPL 2021) आज मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध (Mumbai Indians vs Punjab Kings) होणार आहे. या सामन्यात चाहत्यांना मुंबईचा कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि पंजाबचा दीपक हुड्डा (Deepak Hooda) यांच्यात टशन पाहायला मिळू शकतं. वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघांमध्ये मोठा वाद झाला होता, यानंतर दीपक हुडाचं निलंबनही करण्यात आलं होतं. कृणालसोबत झालेल्या वादानंतर हुड्डाने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून (Syed Mushtaq Ali Trophy) माघार घेतली, यानंतर बडोदा क्रिकेट असोसिएशनने हुड्डाचं संपूर्ण मोसमासाठी निलंबन केलं. काय झाला वाद? कृणाल पांड्याने आपल्याला शिव्या दिल्या, त्यामुळे आपण सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून माघार घेत असल्याचं हुड्डाने सांगितलं. कृणाल पांड्याने आपल्याला सरावापासून रोखलं आणि आपल्यासोबत गैरवर्तणूक केली, असा दावा दीपक हुडाने केला. याबाबत त्याने बडोदा क्रिकेट असोसिएशनला ई-मेलही लिहिला, ज्यात त्याने कृणाल पांड्याबाबत तक्रार केली. कृणाल पांड्याने शिव्या दिल्यामुळे आपण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून माघार घेत असल्याचं त्याने मेलमध्ये लिहिलं. हुडा हा बडोद्याचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने बडोद्यासाठी 46 प्रथम श्रेणी, 68 लिस्ट ए मॅच आणि 123 टी-20 मॅच खेळल्या आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या पहिल्याच सामन्यात राजस्थानविरुद्ध हुड्डाने 28 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली. दीपक हुडाने 228.57 च्या स्ट्राईक रेटने 6 सिक्स आणि 4 फोर मारले.
  Published by:Shreyas
  First published: