IPL 2021, MI vs KKR : मुंबईची लढत कोलकात्याशी, रोहित या खेळाडूंना देणार संधी!

IPL 2021, MI vs KKR : मुंबईची लढत कोलकात्याशी, रोहित या खेळाडूंना देणार संधी!

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमातला पहिलाच सामना जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians vs KKR) आज होणार आहे.

  • Share this:

चेन्नई, 13 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमातला पहिलाच सामना जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians vs KKR) आज होणार आहे. कोलकात्याने रविवारी सनरायजर्स हैदराबादचा (SRH) 10 रनने पराभव केला. आता चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर मुंबई आणि कोलकात्याचा हा सामना होणार आहे. याच मैदानात मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध (RCB) आपला पहिला सामना गमावला होता. विराटच्या आरसीबीने मुंबईचा शेवटच्या बॉलवर पराभव केला होता.

मागच्या दोन वेळा आयपीएल जिंकणारी मुंबई इंडियन्स आता मागच्या सामन्यातल्या चुकांपासून धडा घेत मैदानात उतरेल. तर इयन मॉर्गनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकात्याचा आत्मविश्वास पहिला सामना जिंकल्यामुळे वाढला असेल.

कोलकात्याचे सुरुवातीचे तीन बॅट्समन नितीश राणा, शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी हैदराबादविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला मात्र खास काही करता आलं नव्हतं. या मॅचसाठी क्विंटन डिकॉक उपलब्ध असल्याचं मुंबई इंडियन्सने सांगितलं. पाकिस्तानविरुद्धची सीरिज अर्ध्यात सोडून आल्यानंतर डिकॉक क्वारंटाईन होता, त्यामुळे त्याला पहिला सामना खेळता आला नव्हता. त्याच्याऐवजी क्रिस लीनला संधी देण्यात आली. लीननेही या संधीचं सोनं करत 49 रनची खेळी केली. आता क्विंटन डिकॉकला टीममध्ये घ्यायचं असेल तर कोणाला बाहेर बसवायचं, याबाबतचा निर्णय रोहितला घ्यावा लागणार आहे.

मुंबईचा लेग स्पिनर राहुल चहर याने मागच्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 43 रन दिले होते. राहुल चहरच्याऐवजी रोहित शर्माकडे पियुष चावलाचा पर्याय आहे.

मुंबईची संभाव्य टीम

रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, मार्को जेनसन, पियुष चावला, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह

कोलकात्याची संभाव्य टीम

नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, इयन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, शाकीब अल हसन, पॅट कमिन्स, हरभजन सिंग, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती

Published by: Shreyas
First published: April 13, 2021, 7:35 AM IST

ताज्या बातम्या