मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : बूम-बूमसाठी 'शनी'वार, 8 वर्षांत पहिल्यांदाच... तुमचाही विश्वास बसणार नाही

IPL 2021 : बूम-बूमसाठी 'शनी'वार, 8 वर्षांत पहिल्यांदाच... तुमचाही विश्वास बसणार नाही

आयपीएल (IPL) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सध्याचा सर्वोत्तम बॉलर कोण, असं विचारलं तर बहुतेक क्रिकेट रसिक जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हेच नाव घेतील, पण या सगळ्यात यशस्वी बॉलरसाठी शनिवारचा दिवस (CSK vs Mumbai Indians) इतिहासातला सगळ्या वाईट ठरला.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली : आयपीएल (IPL) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सध्याचा सर्वोत्तम बॉलर कोण, असं विचारलं तर बहुतेक क्रिकेट रसिक जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हेच नाव घेतील, पण या सगळ्यात यशस्वी बॉलरसाठी शनिवारचा दिवस इतिहासातला सगळ्या वाईट ठरला. चेन्नईविरुद्धच्या (CSK vs Mumbai Indians) मॅचमध्ये बुमराहने 4 ओव्हरमध्ये तब्बल 56 रन देऊन 1 विकेट घेतली. आयपीएल इतिहासातली बुमराहची ही सगळ्यात वाईट कामगिरी ठरली.

याआधी बुमराहने 2015 साली दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) 55 रन, 2015 साली बँगलोरविरुद्ध (RCB) 52 रन आणि 2017 साली गुजरात लायन्सविरुद्ध (Gujrat Lions) 45 रन दिले होते. बुमराहने 2013 साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं, यानंतर 8 वर्षांनी पहिल्यांदाच बुमराहने एवढी खराब कामगिरी केली. आयपीएलच्या 99 सामन्यांमध्ये त्याने 7.41 च्या इकोनॉमी रेटने आणि 24.17 च्या सरासरीने 115 विकेट घेतल्या.

या सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) बुमराहला पहिल्यांदा 5व्या ओव्हरला बॉलिंग दिली, तेव्हा त्याच्या पहिल्या ओव्हरला 9 रन आले, यानंतर 11 व्या ओव्हरमध्ये बुमराह पुन्हा बॉलिंगला आला, या ओव्हरमध्ये चेन्नईने 17 रन काढले, तर 17 व्या ओव्हरमध्ये अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) तब्बल 21 रन ठोकले. 19 व्या ओव्हरमध्येही बुमराहने 10 रन दिले.

सुरुवातीपासूनच फाफ डुप्लेसिस (Faf du Plessis) आणि मोईन अलीने (Moeen Ali) बुमराहवर आक्रमण केलं. अंबाती रायुडूने 27 बॉलमध्ये नाबाद 72 रनची खेळी केली, यामध्ये 7 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. रायुडूने तब्बल 266.77 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. मोईन अलीने 36 बॉलमध्ये 58 आणि फाफ डुप्लेसिसने 28 बॉलमध्ये 50 रन केले. या तिघांच्या आक्रमक बॅटिंगमुळे चेन्नईने मुंबईला 219 रनचं आव्हान दिलं.

First published:
top videos

    Tags: Cricket, IPL 2021, Jasprit bumrah, Mumbai Indians