मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : 3 सामन्यांमध्ये मुंबईचं एकच अर्धशतक, दिल्लीविरुद्ध कामगिरी सुधारण्याचं चॅलेंज!

IPL 2021 : 3 सामन्यांमध्ये मुंबईचं एकच अर्धशतक, दिल्लीविरुद्ध कामगिरी सुधारण्याचं चॅलेंज!

आयपीएलच्या (IPL 2021) पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) धडाक्यात पुनरागमन केलं. आरसीबीविरुद्ध (RCB) निराशाजनक कामगिरी केल्यानंतर मुंबईने कोलकाता (KKR) आणि हैदराबादचा (SRH) पराभव केला, आता मंगळवारी मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Dehli Capitals) होणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 19 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) धडाक्यात पुनरागमन केलं. आरसीबीविरुद्ध (RCB) निराशाजनक कामगिरी केल्यानंतर मुंबईने कोलकाता (KKR) आणि हैदराबादचा (SRH) पराभव केला, आता मंगळवारी मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Dehli Capitals) होणार आहे. या दोन्ही टीमने आतापर्यंत प्रत्येकी 3-3 सामने खेळले आहेत, यापैकी 2 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला. दिल्लीची टीम पहिल्यांदाच चेन्नईमध्ये मॅच खेळणार आहे, तर मुंबईने आतापर्यंत त्यांचे सगळेच सामने या मैदानात खेळले आहेत.

मुंबईने तीनपैकी दोन सामने जिंकले असले, तरी त्यांची बॅटिंग मात्र अजूनही अपयशी ठरली आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) चांगली सुरुवात मिळाली आहे, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईकडून तीन सामन्यांमध्ये फक्त सूर्यकुमार यादवलाच (Suryakumar Yadav) अर्धशतक करता आलं आहे, त्यामुळे रोहितसह डिकॉक (Quinton De Kock), इशान किशन (Ishan Kishan), कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यापुढे मोठा स्कोअर करण्याचं आव्हान असेल. चेन्नईची खेळपट्टी बॅट्समनसाठी कठीण ठरत असल्यामुळे या मैदानात 150 रनचा स्कोअरही मॅच जिंकण्यासाठी चांगला ठरत आहे.

मुंबईचा दोन्ही सामन्यांमध्ये बुमराह, बोल्ट आणि राहुल चहर यांच्यामुळे विजय झाला आहे. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये टीमने 150 आणि 152 रनचं आव्हान यशस्वीरित्या वाचवलं. लेग स्पिनर राहुल चहरने मागच्या 2 सामन्यांमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. कोलकात्याविरुद्ध त्याला 4 विकेट घेण्यात यश आलं, यानंतर त्याने हैदराबादविरुद्धही 3 विकेट घेतल्या.

दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) शानदार फॉर्ममध्ये आहे. दोन अर्धशतकांसह धवनने 186 रन केले आहेत, तर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) दोन सामन्यांमध्ये टीमला जलद सुरुवात करून दिली आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने स्टीव्ह स्मिथला संधी दिली होती.

आयपीएलच्या मागच्या मोसमात मुंबईने दिल्लीचा चार वेळा पराभव केला. यातले दोन सामने ग्रुप स्टेजमधले, एक प्ले-ऑफचा तर एक फायनलचा होता. यावेळी मागच्या पराभवांचा बदला घेण्यासाठी दिल्लीची टीम मैदानात उतरेल.

दिल्लीची टीम

ऋषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, क्रिस वोक्स, आर अश्विन, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्किया, इशांत शर्मा, आवेश खान, स्टीव स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णु विनोद, लुकमान मेरिवाला, एम सिद्धार्थ, टॉम करन, सॅम बिलिंग्स, अनिरुद्ध जोशी

मुंबईची टीम

रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, क्रिस लिन, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, मोहसिन खान, हार्दिक पांड्या, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, अनुकूल रॉय, ईशान किशन, क्विंटन डि कॉक, आदित्य तरे, एडम मिल्ने, नाथन कुल्टर नाइल, पियूष चावला, जेम्स नीशम, युद्धवीर चरक, मार्को जेनसन, अर्जुन तेंदुलकर

First published:

Tags: Cricket, Delhi capitals, IPL 2021, Mumbai Indians, Rishabh pant, Rohit sharma