IPL 2021 : मुंबई-कोलकाता मॅचवेळी रितीका-नताशा का झाल्या हैराण?, समोर आलं कारण

IPL 2021 : मुंबई-कोलकाता मॅचवेळी रितीका-नताशा का झाल्या हैराण?, समोर आलं कारण

आयपीएलमध्ये (IPL 2021) मंगळवारी मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (Mumbai Indians vs KKR) पराभव केला होता. ही मॅच बघायला आलेल्या रोहित शर्माची पत्नी रितीका, हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टानकोविक आणि कृणालची पत्नी पंखुडी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

चेन्नई, 16 एप्रिल : आयपीएलमध्ये (IPL 2021) मंगळवारी मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (Mumbai Indians vs KKR) पराभव केला होता. या सामन्यात बहुतेक काळ कोलकात्याच्या हातात होता, पण अखेरच्या काही ओव्हरमध्ये मुंबईने कोलाकात्याच्या हातातली बाजी पलटवली आणि 10 रनने विजय मिळवला. ही मॅच बघायला आलेल्या रोहित शर्माची पत्नी रितीका, हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टानकोविक आणि कृणालची पत्नी पंखुडी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये स्टेडियममध्ये बसलेल्या तिघी मोबाईलमध्ये बघत आहेत, तसंच त्यांच्या चेहऱ्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याचं दिसत आहे.

रितीका, नताशा आणि पंखुडी यांना नेमकं कशाचं आश्चर्य वाटलं, याचा खुलासा मुंबई इंडियन्सने केला आहे. टीमने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो टाकले आहेत. या तिघींना नेमकं कशाचं आश्चर्य वाटलं, हे पाहण्यासाठी स्वाईप करा, असा मेसेज मुंबई इंडियन्सने त्यांचा पोस्टवर केला. स्वाईप केल्यानंतर रोहित शर्माचा बॉलिंग करतानाचा फोटो पोस्ट केला आहे.

रोहित शर्मा कोलकात्याची बॅटिंग सुरू असताना 14 वी ओव्हर टाकण्यासाठी आला होता, या ओव्हरमध्ये त्याने 9 रन दिले. 2014 सालानंतर रोहितने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये बॉलिंग केली, पण पहिला बॉल टाकत असतानाच रोहितच्या पायाला दुखापत झाली. सुरुवातील रोहितची ही दुखापत गंभीर वाटत होती, पण त्यानंतर त्याने बॉलिंग केली. आयपीएलमध्ये रोहितच्या नावावर एक हॅट्रिकही आहे.

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्याचा विजय सहज होईल असं वाटत होतं. कोलकात्याला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 30 रनची गरज होती, पण पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेल यांच्या दोन विकेट गमावल्यानंतर कोलकात्याला 19 रनच बनवता आले. या सामन्यात मुंबईने पहिले बॅटिंग करत 152 रन केले. कोलकात्याकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला 20 ओव्हरमध्ये 142/7 एवढाच स्कोअर करता आला. मुंबईकडून बुमराह, कृणाल पांड्या आणि ट्रेन्ट बोल्ट यांनी उत्कृष्ट बॉलिंग केली.

Published by: Shreyas
First published: April 16, 2021, 6:58 PM IST

ताज्या बातम्या