चेन्नई, 8 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाचा मोसम सुरू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. 9 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यातल्या पहिल्या मॅचने या हंगामाची सुरूवात होईल. गतविजेती आणि आतापर्यंत पाच वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सने यंदा टीममध्ये काही बदल केले आहेत. मागच्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्सकडून (CSK) खेळणाऱ्या लेग स्पिनर पियुष चावला (Piyush Chawala) याला मुंबईने लिलावात 2.4 कोटी रुपयांना विकत घेतलं.
पियुष चावलाच्या कौशल्याचा मुंबई इंडियन्सना फायदा तर होईलच, पण टीममधल्या युवा स्पिनरनाही तो त्याच्या अनुभवामुळे मदत करेल, असं मुंबई इंडियन्सने सांगितलं आहे. रोहित शर्मानेही (Rohit Sharma) पियुष चावलामुळे टीममध्ये आल्यामुळे टीमचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया दिली. 'मी पियुषसोबत अंडर-19 पासून खेळलो आहे. पियुषसारखा आक्रमक बॉलर मला टीममध्ये हवा होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरपैकी तो एक आहे. आयपीएलमध्ये तो बऱ्याच मॅच खेळला आहे, त्यामुळे त्याला हा फॉरमॅट, प्रतिस्पर्धी आणि खेळाडूंबाबत बरीच माहिती आहे,' असं रोहित म्हणाला.
View this post on Instagram
पियुष चावलाही मुंबई इंडियन्सशी जोडला गेल्यामुळे खूश आहे. 'मी खूप आनंदी आणि उत्साही आहे, कारण मुंबई गतविजेती आणि सर्वाधिक आयपीएल जिंकणारी यशस्वी टीम आहे,' असं वक्तव्य पियुष चावलाने केलं. पियुष चावला टीममध्ये आल्यामुळे युवा बॉलर राहुल चहरलाही मदत मिळेल, असा विश्वास मुंबई इंडियन्सचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स झहीर खानने (Zaheer Khan) व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Mumbai Indians, Rohit sharma