मुंबई, 25 जुलै : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या (IPL 2021) दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) रविवारी याची पुष्टी केली आहे. मोसमातल्या उरलेल्या 31 मॅच 27 दिवस होणार आहेत. हे सगळे सामने युएईतल्या दुबई, अबुधाबी, शारजाह या तीन स्टेडियममध्ये खेळवले जातील, तर फायनल 15 ऑक्टोबरला दुबईमध्ये होईल. चेन्नई आणि मुंबई (Chennai Super Kings vs Mumbai Indians) यांच्यातल्या सामन्याने आयपीएलला सुरुवात होईल.
खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे 4 मे रोजी आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. स्पर्धा स्थगित झाली तेव्हा दिल्ली कॅपिटल्स पहिल्या क्रमांकावर तर चेन्नई दुसऱ्या, आरसीबी तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर होती.
सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या या मोसमात 7 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत.
मुंबईच्या सामन्यांचं वेळापत्रक
19 सप्टेंबर- मुंबई विरुद्ध चेन्नई- संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई
26 सप्टेंबर- मुंबई विरुद्ध बँगलोर- संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई
28 सप्टेंबर- मुंबई विरुद्ध पंजाब- संध्याकाळी 7.30 वाजता, अबु धाबी
2 ऑक्टोबर- मुंबई विरुद्ध दिल्ली- दुपारी 3.30 वाजता
5 ऑक्टोबर- मुंबई विरुद्ध राजस्थान- संध्याकाळी 7.30 वाजता
8 ऑक्टोबर- मुंबई विरुद्ध हैदराबाद- दुपारी 3.30 वाजता, अबु धाबी
10 ऑक्टोबर- Qualifier 1- संध्याकाळी 7.30 वाजता-दुबई
11 ऑक्टोबर- Eliminator- संध्याकाळी 7.30 वाजता-शारजाह
13 ऑक्टोबर- Qualifier 2- संध्याकाळी 7.30 वाजता-शारजाह
15 ऑक्टोबर 7.30 वाजता FINAL दुबई
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Mumbai Indians, Rohit sharma