Home /News /sport /

IND vs ENG : मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉन्च, नव्या रंगात मैदानात उतरणार

IND vs ENG : मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉन्च, नव्या रंगात मैदानात उतरणार

मुंबई इंडियन्सनी (Mumbai Indians) आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी (IPL 2021) टीमची नवी जर्सी लॉन्च केली आहे. मुंबई इंडियन्सनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना टीमच्या नव्या जर्सीबाबत माहिती दिली.

    मुंबई, 27 मार्च : मुंबई इंडियन्सनी (Mumbai Indians) आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी (IPL 2021) टीमची नवी जर्सी लॉन्च केली आहे. मुंबई इंडियन्सनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना टीमच्या नव्या जर्सीबाबत माहिती दिली. आयपीएल 2021 मध्ये नव्या रंगात अभिमानाने उतरू, पलटन तयार का? असं लिहून मुंबईने त्यांच्या नव्या जर्सीचा फर्स्ट लूक शेयर केला. ही जर्सी मुंबई इंडियन्सची ओळख असलेल्या निळ्या आणि सोनेरी रंगाची आहे. आयपीएलच्या पहिल्या दोन मोसमात हलक्या निळ्या रंगाची जर्सी घातल्यानंतर मुंबईने 2010 साली जर्सीच्या रंगात बदल केला. जर्सीचा रंग बदलल्यानंतर टीमला फायदा झाला आणि त्याच वर्षी मुंबई पहिल्यांदाच आयपीएल फायनलला पोहोचली. त्यावर्षी टीमला फायनल जिंकता आली नसली, तर पुढचे सगळे मोसम मुंबईने गाजवले. जुन्या जर्सीप्रमाणे या जर्सीमध्येही खांद्यावर सोनेरी रंग आहे, पण यावेळी कडा आणि कॉलरवर नारंगी रंग देण्यात आला आहे. मागच्या मोसमात आयपीएल जिंकणारी मुंबई यावर्षीही इतिहास घडवण्यासाठी मैदानात उतरेल. लागोपाठ तिसऱ्यांदा आयपीएल जिंकण्याची संधी मुंबईकडे आहे. याआधी मुंबईने 2019 आणि 2020 सालची आयपीएल जिंकली होती. यावर्षीही ही स्पर्धा जिंकता आली तर लागोपाठ तीनवेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरणारी मुंबई पहिलीच टीम होईल. मागच्यावर्षी फायनलमध्ये मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि पाचव्यांदा स्पर्धा जिंकली. आयपीएल इतिहासात एवढेवेळा ट्रॉफी पटकावणारी मुंबई ही एकमेव टीम आहे. आता यावर्षीही ही स्पर्धा जिंकण्याची संधी मुंबईकडे आहे, कारण त्यांचे महत्त्वाचे खेळाडू रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव, इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मुंबईची टीम रोहित शर्मा, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरान पोलार्ड, कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, एडम मिल्ने, नाथन कुल्टर नाइल, पियूष चावला, मार्को जेन्सन, युद्धवीर सिं, जेम्स नीशम, अर्जुन तेंदुलकर.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, IPL 2021, Mumbai Indians

    पुढील बातम्या