मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : आयपीएल UAE मध्ये, पण मुंबई टेन्शनमध्ये, 'हुकमी एक्का' खेळणार नाही!

IPL 2021 : आयपीएल UAE मध्ये, पण मुंबई टेन्शनमध्ये, 'हुकमी एक्का' खेळणार नाही!

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचे (IPL 2021) उरलेले सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये (UAE) खेळवण्यात येणार आहेत. पण 5 वेळची चॅम्पियन असणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) मात्र चिंता वाढवणारी बातमी आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 मे : कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचे (IPL 2021) उरलेले सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये (UAE) खेळवण्यात येणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) शनिवारी झालेल्या बैठकीनंतर याची घोषणा केली. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे 29 सामन्यांनंतर 4 मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आली.

एकीकडे बीसीसीआयने आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांसाठी तयारी सुरू केली असतानाच सर्वाधिक 5 वेळची चॅम्पियन असणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) मात्र चिंता वाढवणारी बातमी आहे. मुंबईचा स्टार खेळाडू कायरन पोलार्ड आयपीएलच्या सुरुवातीच्या काही मॅच उपलब्ध नसण्याची शक्यता आहे.

कॅरेबियन प्रीमियर लीग 28 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. या लीगमध्ये कायरन पोलार्डसह (Kieron Pollard) क्रिस गेल (Chris Gayle), सुनिल नारायण (Sunil Nairne), ड्वॅन ब्राव्हो (Dwyane Bravo) आणि वेस्ट इंडिजचे इतर खेळाडू खेळणार आहेत. आयपीएलचा दुसरा टप्पा 19 किंवा 20 सप्टेंबरला सुरू व्हायची शक्यता आहे. अशात क्वारंटाईनच्या नियमांमुळे वेस्ट इंडिजचे खेळाडू आयपीएलसाठी उशीरा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे कॅरेबियन प्रीमियर लीग ही स्पर्धा 10 दिवस आधी खेळवण्यात यावी, अशी चर्चा बीसीसीआय वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डासोबत करत आहे. सीपीएल 10 दिवस आधी सुरू झाली तर, वेस्ट इंडिजचे खेळाडू संपूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध होतील, पण जर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने वेळापत्रक बदलायला नकार दिला, तर मात्र मुंबईसह इतर अनेक टीमनाही मोठा धक्का बसू शकतो.

दुसरीकडे कोलकात्याचा (KKR) फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) याने आयपीएलच्या उरलेल्या मोसमातून माघार घेतली आहे, तर इंग्लंडचे क्रिकेटपटूही आयपीएल खेळणार नाहीत, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर एश्ले जाईल्स यांनी सांगितलं. इंग्लंडचे 14 क्रिकेटपटू यंदाच्या आयपीएलमध्ये होते. बीसीसीआयने मात्र परदेशी खेळाडू उपलब्ध करण्याबाबात वेगवेगळ्या बोर्डांशी चर्चा करू असं सांगितलं आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. 7 पैकी 4 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला, तर 3 सामने त्यांनी गमावले. यावेळी कायरन पोलार्डने आयपीएल इतिहासातल्या सर्वोत्तम वादळी खेळीपैकी एक केली. चेन्नईने ठेवलेलं 219 रनचं आव्हान मुंबईने कायरन पोलार्डच्या धमाकेदार खेळीमुळे पूर्ण केलं. पोलार्डने त्या सामन्यात 34 बॉलमध्ये 87 रन केले, यात 8 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, Kieron pollard, Mumbai Indians