• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : मुंबई इंडियन्सचे हे खेळाडू घरी पोहोचले, पण काही जण अजूनही अडकले

IPL 2021 : मुंबई इंडियन्सचे हे खेळाडू घरी पोहोचले, पण काही जण अजूनही अडकले

कोरोनामुळे आयपीएल (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सुरक्षितपणे स्वत:च्या घरी पोहोचले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 9 मे : कोरोनामुळे आयपीएल (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सुरक्षितपणे स्वत:च्या घरी पोहोचले आहेत. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोलकाता (KKR), चेन्नई (CSK) आणि हैदराबादचे (SRH) खेळाडू तसंच सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने (BCCI) आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पाचवेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सने आपले कोणते खेळाडू घरी पोहोचले आहेत, याबाबत माहिती दिली. याबाबतचं ट्वीट मुंबईने केलं आहे. 4 मे रोजी आयपीएल स्थगित केल्यानंतर 14 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सुरक्षित रित्या घरी पोहोचला आहे. कायरन पोलार्डला त्रिनिदादला तसंच क्विंटन डिकॉक आणि मार्को जेनसनला जोहान्सबर्गला पोहोचवण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्समध्ये असलेल्या न्यूझीलंडच्या एडम मिल्ने, जेम्स नीशम, ट्रेन्ट बोल्ट, बॉलिंग प्रशिक्षक शेन बॉण्ड यांच्यासह सपोर्ट स्टाफला चार्टर विमानाने ऑकलंडला पाठवण्यात आलं आहे. मुंबईच्या टीममध्ये असलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू क्रिस, लीन, नॅथन कुल्टर नाईल आणि श्रीलंकेचा महेला जयवर्धने यांच्याह सपोर्ट स्टाफ मालदीवमध्ये आहे. हे सगळे 14 दिवस मालदीवमध्येच 14 दिवस क्वारंटाईन राहणार आहेत. भारतात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या नागरिकांवर बंदी घातली आहे, म्हणून ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवमध्ये गेले आहेत.
  Published by:Shreyas
  First published: