चेन्नई, 20 एप्रिल : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आयपीएलच्या या मोसमात (IPL 2021) तीनपैकी एकाही सामन्यात बॉलिंग केली नाही, त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. यानंतर आता मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) याने हार्दिकच्या बॉलिंग न करण्याचं कारण सांगितलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडेमध्ये हार्दिकच्या खांद्याला थोडी दुखापत झाली होती, तो या दुखापतीतून बरा होत आहे. आम्हीही त्याच्या बॉलिंगची वाट पाहत आहोत, असं जयवर्धने म्हणाला.
'आम्हाला हार्दिकबाबत सध्या कोणताही धोका पत्करायचा नाही. बॉलिंग करण्यासाठी जेव्हा तो कम्फर्टेबल असेल, तेव्हाच त्याला बॉलिंग दिली जाईल. पुढच्या काही आठवड्यांमध्ये तो बॉलिंग करेल, अशी अपेक्षा आहे. आम्ही त्याला मुद्दाम सध्या बॉलिंग देत नाही,' अशी प्रतिक्रिया जयवर्धनेने दिली.
हार्दिक पांड्याने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वॉर्नर आणि अब्दुल समदला रन आऊट करुन मुंबईला 13 रनने विजय मिळवून दिला. आम्हाला हार्दिकला बाऊंड्री लाईनवर फिल्डिंगला ठेवायचं आहे, कारण त्याचा थ्रो खूप जलद असतो आणि तो शानदार कॅच पकडतो, पण खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला 30 यार्डामध्येच ठेवावं लागत असल्याचं, जयवर्धनेने सांगितलं.
आयपीएलच्या या मोसमात चेन्नईची खेळपट्टी संथ आहे, पण खेळण्यासाठी असंभव नसल्याचं मत जयवर्धनेने मांडलं आहे. या मोसमात चेन्नईत झालेल्या 6 मॅचपैकी फक्त तीनवेळा टीमना 150 पेक्षा जास्तचा स्कोअर करता आला आहे, तर 5 टीम पहिले बॅटिंग करुन जिंकल्या आहेत. पण रविवारी बँगलोर आणि राजस्थानमध्ये झालेल्या सामन्यात मोठी धावसंख्या झाली. बँगलोरने या मॅचमध्ये 4 विकेट गमावून 204 रन केले, यानंतर त्यांचा 38 रनने विजय झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hardik pandya, IPL 2021, Mumbai Indians